इंटरनेटचा अतिवापर मुलांसाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:39 IST2016-02-16T11:39:23+5:302016-02-16T04:39:23+5:30

इंटरनेटचा वापरात किशोरवीयन मुलेही मागे नाहीत. मात्र याचा अतिवापर हा आरोग्यासाठी घातक ठरतो असे संशोधकांचे म्हणने आहे. 

Internet access is dangerous for children | इंटरनेटचा अतिवापर मुलांसाठी घातक

इंटरनेटचा अतिवापर मुलांसाठी घातक

टरनेटचा वापरात किशोरवीयन मुलेही मागे नाहीत. मात्र याचा अतिवापर हा आरोग्यासाठी घातक ठरतो असे संशोधकांचे म्हणने आहे.

दिवसभरात जास्तीत-जास्त वेळ इंटरनेटवर घालविल्याने किशोरवयीन मुलांना उच्च रक्तदाबाचा किंवा स्थूलतेचा त्रास होऊ शकतो, असे अमेरिकेतील संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

सुमारे आठवड्यातील 14 तास इंटरनेटवर घालवणाºया मुलांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे दिसून आले. एकूण 134 मुलांचे या संशोधनासाठी निरीक्षण करण्यात आले. ही सर्व किशोरवयीन मुले इंटरनेटचा सर्वाधिक वापर करणारी होती.

यापैकी 26 जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे दिसून आले. संशोधनातील मुले नेटचा वापर आठवड्यातील 25 तास करत असल्याचे दिसून आले. यामुळे उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा असे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Web Title: Internet access is dangerous for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.