अपुऱ्या झोपेमुळे वाढतो अचरबचरपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:22 IST2016-03-02T12:22:24+5:302016-03-02T05:22:24+5:30

नव्या संशोधनानुसार अपुऱ्या झोपेमुळे अनहेल्थी जेवण घेण्याची वृत्ती वाढते.

Insufficient sleep due to insufficient sleep | अपुऱ्या झोपेमुळे वाढतो अचरबचरपणा

अपुऱ्या झोपेमुळे वाढतो अचरबचरपणा

पारी लंचमध्ये पोटभरून जेवण केली तरी संध्याकाळी स्नॅक्स खाण्याचा मोह आवरत नाही. तुमची जर अशी स्थिती असेल तर याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

कारण नव्या संशोधनानुसार अपुऱ्या झोपेमुळे अनहेल्थी जेवण घेण्याची वृत्ती वाढते आणि त्यामुळे शरीरातील कॅलरीच्या प्रमाणात वृद्धी होते.

संशोधकांनी असे दिसून आले की, पुरेशी झोप न झाल्यामुळे रासायनिक सिग्नल्सची रक्तपातळी वाढून गोड, मीठाचे प्रमाणे जास्त असलेल पदार्थ, फॅटयुक्त स्नॅक्स खाण्याचा मोह होतो. अशा खाण्यामुळे वजन वाढते. झोपेच्या कमतरतेमुळे अतिखाण्याची इच्छा उत्पन्न होते. 

संशोधकांनी केलेल्या प्रयोगांमध्ये आठ तास झोप घेतलेल्या लोकांच्या तुलनेत अपुरी झोप घेतलेल्या लोकांना दुप्प फॅटयुक्त पदार्थ खाल्ले.

binge eating

शिकागो विद्यापीठातील सहसंशोधक एरिन हॅन्लन यांनी माहिती दिली की, झोप न झाल्यामुळे अपौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा अधिक बळकट होते. एक प्रकारचे आसूरी आनंद यातून मिळतो.

Web Title: Insufficient sleep due to insufficient sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.