घरकामात मदत केल्याने वाढते सेक्स लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:13 IST2016-01-16T01:14:43+5:302016-02-10T14:13:25+5:30

जे पुरुष घरातील विविध कामांत बायकोची मदत करतात त्यांची सेक्स लाईफ आनंददायी आणि समाधानी असते. विशेष म्हणजे, त्यांची सेक्स फ्रिक्वेन्सीदेखील वाढते.

Increasing Sex Life By Helping In The Housewife | घरकामात मदत केल्याने वाढते सेक्स लाईफ

घरकामात मदत केल्याने वाढते सेक्स लाईफ

रा-बायकोचे नाते हे सामंजस्यावर आधारित असते. संपूर्ण आयुष्य सोबत जगताना प्रत्येक गोष्टीत दोघांनी तितक्याच आवडीने सहभाग घ्यायला हवा. मात्र भारतीय समाजव्यवस्थेत नवरा केवळ पैसे कमवणार आणि घरकाम बायकांनी घरकाम करावे, असा एक अलिखित नियम आहे. त्यामुळेच असेल कदाचित घरकाम करणे नवरोबांना कमीपणाचे वाटते.

तुम्हीही यातले असाल तर हा विचार मनातून काढून टाका. कारण,जे पुरुष घरातील विविध कामांत बायकोची मदत करतात त्यांची सेक्स लाईफ आनंददायी आणि समाधानी असते. विशेष म्हणजे, त्यांची सेक्स फ्रिक्वेन्सीदेखील वाढते. ही हवेतली गोष्ट नाही. एका संशोधनाअंती ही बाब समोर आली आहे.

अल्बार्टा विद्यापीठाचे संशोधक मॅट जॉन्सन सांगतात की, 'घरातील साध्या साध्या कामात पुरुषाने सहभाग घेतला तर जोडीदाराच्या लैंगिक जीवनातही याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतो. ते पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात एकमेकांशी सहवास करतात. त्यामुळे सगळ्या पुरुषांनी येथून पुढे स्वत:हून धुणी-भांडी करण्यात पुढाकार घ्यायला हरकत नाही.'

या संशोधनाने पूर्वी झालेल्या एका संशोधनाला खोटे ठरविले आहे. पूर्वीच्या स्टडीनुसार, जी कामे विशेष करून महिलांची असतात, ती जर पुरुषांनी केली तर दोघांमध्ये सेक्सची आवड कमी होते असे म्हटले होते. परंतु या नव्या संशोधनात १३३८ र्जमन जोडीदारांचा पाच वर्षे अभ्यास करण्यात आला. यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे हा रंजक निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासात पुरुष घरकामाकडे कसे पाहतो याचा देखील विचार करण्यात आला.

Web Title: Increasing Sex Life By Helping In The Housewife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.