चेहऱ्याची चमक वाढविताना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:33 IST2016-12-08T17:33:00+5:302016-12-08T17:33:00+5:30

आज प्रत्येकाला कामानिमित्त बाहेर पडावे लागते. बाह्य वातावरण व त्यातील प्रदूषणाचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहीशी होते

Increasing the brightness of the face! | चेहऱ्याची चमक वाढविताना !

चेहऱ्याची चमक वाढविताना !

प्रत्येकाला कामानिमित्त बाहेर पडावे लागते. बाह्य वातावरण व त्यातील प्रदूषणाचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहीशी होते. याकडे जास्तच दुर्लक्ष झाल्यास त्वचेशी संबंधित समस्याही निर्माण होतात. या समस्येपासून सुटका करावयाची असल्यास तर काळजी करु नका. आम्ही खाली काही उपयुक्त टिप्स देत असून, त्याआधारे आपल्या सर्व समस्या सुटतील व आपल्या चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होईल. 

दूध
दुधाच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने आपण ग्लो आणू शकता. यासाठी चेहऱ्यावर फॅट्स असलेले दूध लावा आणि तोपर्यंत मसाज करा जोपर्यंत ते त्वचेत पूर्णपणे शोषले जात नाही. यानंतर सकाळी चेहरा फेसवॉशने धुवून घ्या. 

मुलतानी माती 
रात्रीच्या वेळी मेकअप काढतांना स्कर्ब करावा आणि मग मेकअप साफ करावा. यानंतर चेहऱ्यावर मध आणि मुलतानी मातीची पेस्ट लावावी. ही पेस्ट १५ मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुऊन घ्या. यानंतर नाईट क्रिम लाऊन झोपून जा. सकाळी उठून चेहरा स्क्रब अथवा फेस वॉश करा. 

फेस आॅईल 
चेहऱ्याच्या त्वचेसाठी आयुर्वेदिक तेल खरेदी करा. जर तुमचा चेहरा ड्राय असेल तर रात्रभर चेहऱ्यावर तेल लावा आणि सकाळी चेहरा धुवा. जर तुमची त्वचा नॉर्मल असेल तर एका तासाने चेहरा धुऊन घ्या. यामुळे त्वचेचे नीट पोषण होईल आणि सुरकुत्या पडण्यापासूनही त्वचेचे रक्षण होईल.  

स्लिपिंग पॅक
हे पॅक तुम्हाला मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध होईल. याच्या वापरासाठी चेहरा सर्वप्रथम नीट धुऊन घ्या. यानंतर एक चमचा स्लिपिंग पॅक घ्या आणि चेहऱ्याला मालिश करा. हे आरामशीर त्वचेमध्ये शोषले जाते. सकाळी उठून चेहरा फेसवॉशने धुवून घ्या. 

तांदूळ आणि तिळाचे स्क्रब 
या स्क्रबला बनविण्यासाठी रात्री एका वाटीत तांदूळ आणि तीळ एक समान मात्रेत घ्या आणि भिजवून ठेवा. हे भिजल्यावर त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने चेहरा धुऊन घ्या. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातील आणि चेहरा चमकदार दिसायला लागेल. 

Web Title: Increasing the brightness of the face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.