फौंंडेशनने वाढवा सौंदर्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 16:46 IST2016-12-27T16:46:04+5:302016-12-27T16:46:04+5:30
आज प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी ती वेगवेगळ्या पद्धतीचा मेकअप करीत असते. मात्र, बऱ्याचदा योग्य मेकअप पद्धती माहिती नसल्याने सौंदर्यात बाधा येते. खालील काही ट्रिक्स देत असून, त्याद्वारे आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल.

फौंंडेशनने वाढवा सौंदर्य !
त्वचेचे एक वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक ऋतूत तिचे रंग व गरज बदलते. म्हणून वातावरणानुसार त्वचेची गरज ओळखून फौंडेशन बदलणे गरजेचे आहे.
कसे लावावे फौंडेशन-
फौंडेशन लावताना एक त्रिकोणी स्पंज वापरा. सामान्य स्पंज वापरू नका. कारण सामान्य स्पंजने एकावेळी समप्रमाणात पूर्ण चेहरा कव्हर होत नाही. फौंडेशन लावताना ते पापण्यावरही लावले जाईल याकडे लक्ष द्या. ज्यामुळे टोन सारखा होऊन पापण्या चमकदार दिसतील. तसेच मध्यभागी सुरुवात करुन बाहेरच्या दिशेला लावत गळ्यालासुद्धा फाउंडेशन लावा.