शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दाट, चमकदार, लांब केसांसाठी कॉफीचा 'असा' करा वापर, काही दिवसात बदलेल केसांचा चेहरा-मोहरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 11:21 IST

Coffee For Hair Growth : कॉफीचा वापर तुम्ही केस हेल्दी ठेवण्यासाठीही करू शकता. केसांना कॉफी लावल्याने केस मजबूत होतात आणि त्यांची वाढही वेगाने होते.

Coffee For Hair Growth : जास्तीत जास्त लोक रोज दिवसाची सुरूवात एक कप कॉफीने करतात. कॉफी टेस्ट आणि आरोग्य दोन्ही दृष्टीने फायदेशीर ठरते. एक कॉफीने अनेकांना दिवसभरासाठी एनर्जी मिळते. कॉफीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. कॉफीने हृदयाचं आणि लिव्हरचं आरोग्यही चांगलं राहतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कॉफी केसांसाठीही फायदेशीर असते. तेच आम्ही सांगणार आहोत.

कॉफीचा वापर तुम्ही केस हेल्दी ठेवण्यासाठीही करू शकता. केसांना कॉफी लावल्याने केस मजबूत होतात आणि त्यांची वाढही वेगाने होते. त्याशिवाय केस दाट होतात आणि चमकादरही होतात. फक्त तुम्हाला यासाठी कॉफीचा वापर कसा करावा हे माहीत असलं पाहिजे. चला तर जाणून घेऊ.

केसांना कॉफी लावण्याची पद्धत

कॉफीचा हेअर मास्क

2 चमचे कॉफी पावडर घ्या आणि यात 1 कप दही किंवा एलोवेरा जेल मिक्स करा. आता ही पेस्ट केसांच्या मूळात आणि केसांना लावा. 30 ते 40 मिनिटांनंतर एखाद्या माइल्ड शाम्पूने केस धुवून घ्या. या मास्कने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मुलायम होतात.

कॉफी स्प्रे

कॉफी स्प्रे बनवण्याची पद्धत फारच सोपी आहे. कॉफी पावडर नॉर्मल पाण्यात मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि केसांवर स्प्रे करून मसाज करा. 15 ते 20 मिनिटांनंतर केस शाम्पूने धुवून घ्या.

कॉफीचा स्क्रब

कॉफी स्क्रब तयार करण्यासाठी 1 चमचा कॉफी पावडरमध्ये 1 चमचा मध आणि 2 मोठे चमचे खोबऱ्याचं तेल मिक्स करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावून 10 मिनिटे मालिश करा. नंतर शाम्पूने केस धुवून घ्या. याने केसांची वाढ चांगली होते.

कॉफीपासून बनवा हेअर ऑईल

2 चमचे कॉफी पावडर खोबऱ्याच्या तेलात टाकून हलकी गरम करा. थंड झाल्यावर हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा आणि 1 ते 2 तासांनी केस शाम्पूने धुवून घ्या. याने केस मजबूत होतील आणि केसगळतीही कमी होईल.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स