केसगळती थांबेल, केस वाढतीलही खूप; फक्त तुरटीचा 'असा' करा वापर, महागडी प्राॅडक्ट्स विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:54 IST2025-05-20T16:11:57+5:302025-05-20T17:54:06+5:30
Alum for Hair Care : आजकाल जास्तीत जास्त लोकांना केसगळती, केसात कोंडा होणे, केस पातळ होणे किंवा तुटणे अशा समस्या होतात. या सगळ्या समस्या तुरटीच्या मदतीनं दूर करू शकता.

केसगळती थांबेल, केस वाढतीलही खूप; फक्त तुरटीचा 'असा' करा वापर, महागडी प्राॅडक्ट्स विसराल
Alum for Hair Care : तुरटी तुम्ही त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासोबतच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा करू शकता. पण अनेकांना यासाठी तुरटी कशी वापरावी हेच माहीत नसतं. आजकाल जास्तीत जास्त लोकांना केसगळती, केसात कोंडा होणे, केस पातळ होणे किंवा तुटणे अशा समस्या होतात. या सगळ्या समस्या तुरटीच्या मदतीनं दूर करू शकता. यासाठी तुरटी कशी वापरावी हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यातील सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इतर केमिकलसारखे तुरटीचे केसांवर काहीच दुष्परिणाम होत नाहीत.
केसांची वाढ झरझर होईल
तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल आणि केस वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला फायदा मिळाला नसेल तर एकदा तुरटीचा उपाय करून बघा. यासाठी तुरटीचं पावडर घ्या आणि खोबऱ्याच्या तेलात ते मिक्स करून केसांवर लावा. या तेलानं डोक्याच्या त्वचेवर हलक्या हातानं मालिश करा. रात्रभर हे तेल केसांना असंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस शाम्पूने धुवा. काही दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला फरक दिसून येईल.
पांढरे केस काळे करण्यासाठी...
बऱ्याच लोकांचे आजकाल कमी वयातच केस पांढरे होतात. केस पुन्हा नॅचरली काळे करण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरते. उपाय करण्यासाठी तुरटीचं पावडर कलौंजीच्या तेलात मिक्स करा.या तेलात तुरटी टाकून याने डोक्याच्या त्वचेची मालिश करा. असं केल्याने डोक्यात ब्लड फ्लो वाढतो आणि केसांची समस्या दूर होते. ब्लड फ्लो सुधारल्यास केसही काळे होतात.
कोंडा होईल गायब
बऱ्याच लोकांना कोणत्याही वातावरणात जास्त घाम येतो. ज्यामुळे केस चांगले स्वच्छ होत नाही. डोक्याच्या त्वचेवरही धूळ-माती जमा होते. ज्यामुळे केसांमध्ये भरपूर कोंडा होतो. अशात तुरटीचं पावडर तयार करा ते थोडं पाणी लिंबाच्या रसात टाका. याने डोक्याच्या त्वचेची मालिश करा. असं केल्याने केसांमधील कोंडा दूर होईल.