Lip Care: ओठांवरील पिगमेंटेशन अशी समस्या जी अनेकांना असते. आनुवांशिक, धुम्रपान, लिपिस्टिकमुळे झालेलं इरिटेशन, सूर्याची नुकसानकारक किरणे आणि पुन्हा पुन्हा ओठांवर जीभ लावल्यामुळे ओठ काळे पडतात. ओठ काळे झाल्यावर लिपस्टिक किंवा रंगीत लिपबाम लावला जातो. पण तरूणांना ही समस्या जास्त होते. कारण ते मुलींप्रमाणे ओठांवर लिपस्टिक किंवा रंगीत लिपबाम लावू शकत नाहीत. अशात ओठ नॅचरलपणे गुलाबी करण्यासाठी किंवा काळेपटपणा दूर करण्यासाठी हळदीचा एक खास उपाय करता येऊ शकतो. या उपायानं ओठांचा रंग उजळतो आणि काळपटपणा दूर होतो.
ओठ गुलाबी बनवण्यासाठी
हळदीमधील अॅंटी-सेप्टिक गुण आणि ब्रायटनिंग गुण ओठ गुलाबी करण्यास प्रभावी ठरतात. यासाठी हळदीमध्ये थोडं कच्च दूध मिक्स करून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट ओठांवर लावा. फक्त ही पेस्ट थोडी पातळच ठेवावी. ओठांवर १० ते १५ मिनिटं ती तशीच लावून ठेवा आणि नंतर धुवून घ्या. यानं ओठांवर जमा झालेली डेड स्कीन सेल्स निघून जाते आणि ओठांना रंगत येते.
इतरही काही उपाय
- ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही बीट ओठांवर घासू शकता. तसेच बिटाचा रसही ओठांवर लावू शकता.
- मधाच्या स्क्रबनं सुद्धा ओठांचा काळपटपणा दूर होऊ शकतो. यासाठी साखर आणि मध मिक्स करून ओठांवर लावा. त्यानंतर हळुवार ओठांची मसाज करा. १० मिनिटांनी ओठ धुवून घ्या. ओठ मुलायम होतील आणि रंगतही वाढेल.
- हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या जवळपास सगळ्यांनाच होते. अशात ओठ मुलायम ठेवण्यासाठी आणि त्यांची रंगत वाढवण्यासाठी ओठांवर खोबऱ्याचं तेल लावून ठेवा.
-ओठांची त्वचा मुलायम आणि रंगतदार करण्यासाठी कॉफी पावडरही वापरू शकता. कॉफी पावडर मधात मिक्स करून ओठांवर लावू शकता. यानं ओठांवर चमक येईल.