तुमचा सुध्दा चेहरा काळा पडतो का? तर हे टाळण्यासाठी या काही खास टीप्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:22 PM2019-11-28T17:22:05+5:302019-11-28T17:42:20+5:30

त्वचा उजळ होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा.

How to Remove Tan from Face and Skin | तुमचा सुध्दा चेहरा काळा पडतो का? तर हे टाळण्यासाठी या काही खास टीप्स 

तुमचा सुध्दा चेहरा काळा पडतो का? तर हे टाळण्यासाठी या काही खास टीप्स 

googlenewsNext

(Image credit-TOI)

त्वचा उजळ होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. यासाठी योग्य आहार आणि त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या जीवनशैलीत प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे नीट लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होते. तुम्हाला देखील या समस्येचा सामना करावा लागत असेल तर काही घरगुती टीप्सचा वापर करुन चेहरा सुंदर  मिळवू शकता.

(image credit-stylecraze)

रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्युस प्यायल्याने चेह-याचा रंग सुधारण्यास मदत होते. तसेच चेहरा आकर्षक दिसतो. झोप पुर्ण न होणे, हार्मोनल बदल यामुळे डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने मालिश करावी. असे केल्याने डार्क सर्कल्स कमी होतात.

(American academyofdermatology)

नारळ पाण्यात असे  काही गुण असतात. जे शरीराला फायदेशीर ठरतात. नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीरावरील डाग कमी होतात. यामुळे नारळ पाणी सेवन केल्यास त्वचेला गुणकारी ठरेल.

(image credit-News Track English)

ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने तुमची त्वचा आकर्षक आणि हेल्दी राहते. कारण यात फायबर, व्हिटॅमिन तसेच यात अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स असल्याने अनेक रोगांपासूनही बचाव होतो. काजू खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. याने डेड आणि सुरकुत्या पडलेली त्वचा उजळून निघते. अक्रोडमधील अ‍ॅंटी-एजिंग गुण त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात. 


चेहर्‍यावर डाग असले तर जायफळ व अनंतमुळ चूर्ण सम प्रमाणात घेऊन दुधामध्‍ये उगाळून ही पेस्ट पंधरा दिवस नियमित चेहर्‍याला लावावी. चेहर्‍यावर ताजा लिंबू कापून त्याची फोड घासावी. तसेच काकडी, सफरचंद ,पपई, यांसारख्या फळांचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी पोटाच्या आजारा पासून वाचवा. सकाळी पोट साफ करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि आल्याचा रस मिक्स करून प्या. रोज ३ ते ४ लीटर पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील. वेळेत जेवण करावे. रोज व्यायाम केल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरते. फास्ट फूड खाण्याच्या ऐवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत. 

(Image credit- Beautytipsf0rindianwomen)

(टीप-वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)
 

Web Title: How to Remove Tan from Face and Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.