कार्यालयात कसे वागाल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 19:35 IST2016-03-20T02:35:44+5:302016-03-19T19:35:44+5:30

नोकरी करणाºयांचा  जादा वेळ हा आपल्या कार्यालयीन सहकाºयासोबतच जातो.

How to handle the office? | कार्यालयात कसे वागाल ?

कार्यालयात कसे वागाल ?

----
------------------------------
  त्याकरिता कार्यालयात संबंध चांगले ठेवणे हे खूप आवश्यक आहे.  सहकाºयांसोबत कसे राहावे व कसा व्यवहार करावा. याकरिता अशी कोणतीही नियमावली नाही. परंतु, कार्यालयात असतांना काही गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेच्या आहेत. 

असहमती बोलून दाखवू नये : कार्यालयात काही वेळा राजकारणापासून वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते. सर्वांना विचार हे वेगवेगवळे असतात. त्यामुळे दुसºयाच्या मताशी आपण सहमत होऊ शकत नाही. परंतु, थेट आपली असहमती बोलून दाखवू नये.  त्यामुळे आपण त्यांचे विरोधक आहेत, असे ते वागायला लागतात. 

बोलताना सावधानता : कार्यालयात दुसºयासोबत बोलतांना नेहमी चांगल्या शब्दांचा वापर करावा. आपले कुटुंब व मित्रांबरोबर बोलतांना जे शब्द आपण वापरतो ते सहकाºयांसोबत वापरु नये. आपल्या एखाद्या मित्राला बोलतांना कोणताही शब्द वापरला तरी चालेल. परंतु, तोच शब्द आपल्या कार्यालयीन सहकाºयासोबत वापरु नये. त्याचे त्याला फार वाईट वाटेल . त्याकरिता बोलतांना सावधानता बाळगणे हे खूप आवश्यक आहे. 

विश्वासू : आपल्याला करिअरच्या उंच शिखर गाठायचे आहे तर त्याकरिता आपल्या ज्यूनिअर व सिनीअर्स सहकाºयांचा तुम्ही विश्वास संपादन करायला शिका. विश्वासामुळेच तुमची प्रगती होऊ शकते. तुमच्या विश्वास असल्यामुळे कुणी काही सांगितले. तर ते आपल्यापुरतेच ठेवून, इतरांना सांगू नये . 

दिल्लगी करणे  :  अनेक वेळा काहीजण दोनअर्थी दिल्लगी करतात. याकरिता आपण यावर लक्षात घेतले पाहीजे की, आपण कुणासोबत दिल्लगी करु लागलो. आपण जर पुरुष असेल तर महिलांची  दिल्लगी करणे टाळावे.

बाहेर फिरायला जाणे : कार्यालयातील सहकाºयांसोबत काही वेळेला बाहेर फिरायला जाणेही आवश्यक आहे. यामुळे मनात एकमेकांविषयी चांगली भावना निर्माण होते. तसेच दुसºयांचे विचारही कळून येतात. संबंध सुधारण्यासाठी हा चांगला उपाय आहे.

Web Title: How to handle the office?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.