त्वचेच्या आतील पिंपल्स दूर करण्यासाठी खास आणि सोपे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 11:43 AM2019-10-08T11:43:35+5:302019-10-08T11:52:32+5:30

प्रत्येकालाच चमकदार आणि मुलायम त्वचा हवी असते. मात्र, आपल्याच काही लाइफस्टाईलसंबंधी चुकांमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचेच्या समस्या सतत होत राहतात.

How to get rid of a pimple under the skin | त्वचेच्या आतील पिंपल्स दूर करण्यासाठी खास आणि सोपे घरगुती उपाय!

त्वचेच्या आतील पिंपल्स दूर करण्यासाठी खास आणि सोपे घरगुती उपाय!

Next

प्रत्येकालाच चमकदार आणि मुलायम त्वचा हवी असते. मात्र, आपल्याच काही लाइफस्टाईलसंबंधी चुकांमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचेच्या समस्या सतत होत राहतात. यातील मुख्य समस्या म्हणजे शुष्क त्वचा, पिंपल्स आणि इतरही काही समस्या. पिंपल्सही सर्वात कॉमन समस्यांपैकी एक. त्वचेवर पिंपल्स आल्यास वेगवेगळे उपाय केले जातात. पण जेव्हा त्वचेच्या आत पिंपल्स येतात तेव्हा चिंता वाढते. पण हे त्वचेच्या आतील पिंपल्स दूर करण्यासाठी काही खास आणि सोपे उपाय आहेत. 

सेंधव मीठ

सेंधव मीठ त्वचेच्या आतील पिंपल्स दूर करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय मानलं जातं. सेंधव मिठात मॅग्नेशिअम असतं, ज्याला अॅंटी-इंफ्लेमेट्री एजंट मानलं जातं. इंफ्लेमेट्री एजंटमुळे सेंवध मीठ पिंपल्सच्या उपचारासाठी फायदेशीर असतं. त्वचेच्या आतील पिंपल्सवर उपचार करण्यासाठी सेंवध मीठ गरम पाण्यात टाक आणि नंतर त्यात कापड भिजवा. हा कापड तुमच्या पिंपल्सवर ठेवा. ही प्रक्रिया काही पुन्हा पुन्हा करा. हा उपाय तुम्ही दिवसातून ३ ते ४ वेळा करू शकता.

एसेंशिअल ऑइल

त्वचेच्या आतील पिंपल्ससाठी टी-ट्री ऑइल आणि लॅव्हेंडर ऑइलसारखे एसेंशिअल ऑइल फायदेशीर ठरतात. हे तेल तुम्ही पिंपल्सवर लावाल तर तुम्हाला पिंपल्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

अ‍ॅपल व्हिनेगर

त्वचेच्या आतील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅपल व्हिनेगर फायदेशीर ठरतं. तसेच पिंपल्सचा लालसरपणा कमी करण्यासाठी थेट पिंपल्सवर अ‍ॅपल व्हिनेगर लावा. मात्र अ‍ॅपल व्हिनेगरचा वापर कमी प्रमाणात करावा. कारण यात अ‍ॅसिड असतं.

ग्रीन टी

त्वचेच्या आतील पिंपल्स कमी करण्यासाठी ग्रीन-टी फायदेशीर ठरते. पिंपल्सवर याचा वापर करण्यासाठी  ग्रीन टी तयार करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. नंतर थंड झालेली ग्रीन टी पिंपल्सवर लावा. याने तुमची समस्या दूर होईल.

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)


Web Title: How to get rid of a pimple under the skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.