हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असते. तसंच निस्तेज सुद्धा दिसायला सुरूवात होते. प्रत्येकजण आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी फक्त महिलाच नाही तर पुरूष सुध्दा वेगवेगळे उपाय करत असतात. घरगुती उपायांपासून महागडी उत्पादनं विकत घेण्यापर्यंत चेहरा सुंदर दिसावा यासाठी प्रयत्न करत असतात. कारण जर चेहरा सुंदर असेल तर व्यक्तिमत्त्वात भर पडत असते, पण त्याच चेहऱ्यावर जर काळे डाग आणि पुळकुट्या असतील, तर चेहरा चांगला दिसत नाही. पण ही सगळी उत्पादन वापरल्यामुळे काहीवेळा त्यात असलेल्या केमिकल्समुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते.
बेसन - हळदीचं स्क्रब
या स्क्रबला तयार करण्यासाठी एक चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा बेसन घ्या त्यात दुधाची साय मिक्स करा. या मिश्रणाची पेस्ट तयार करून घ्या. नंतर चेहऱ्यावर मसाज करा. आणि ती चेहऱ्यावर लावा सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. या स्क्रबमुळे त्वचा सुंदर दिसेल.
मुल्तानी मातीचं स्क्रब
जर तुम्ही हिवाळ्यात अंघोळ करण्याआधी या स्क्रबचा वापर कराल तर तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. यासाठी मुलतानी माती, तसंच बदामाचे तेल आणि गुलाबजल आवश्यकेतेनुसार घाला. आणी या मिश्रणाला चेहऱ्याला लावा. ३० मिनीटांनी चेहरा धुवून टाका.त्यामुळे चेहऱ्यावरचा कोरडेपणा दूर होईल. हे मिश्रण तुम्ही हातांपायांसाठी सुद्धा वापरू शकता.
मसूरच्या डाळीचं स्क्रब
मसूरची डाळ खाऊनही त्वचेला वेगवेगळे फायदे होत असतात. या डाळीचं स्क्रब तयार करण्यासाठी दोन-तीन चमचे मसूरची डाळ बारीक करा. आता यात अर्धा कप दूध टाकून एक तासासाठी तसंच राहू द्या. डाळ फुगल्यावर ती मिक्सरमधून बारीक करा. ही पेस्ट ३० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. याने त्वचा मुलायम होईल आणि त्वचेचा ड्रायनेसही दूर होईल.