शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

हिवाळ्यात केसांसाठी फायदेशीर ठरतात 'हे' हेअर मास्क; असे करा तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 16:30 IST

हिवाळ्यात थंड हवेमुळे केस कोरडे होतात. तसेच केस शुष्क आणि निस्तेज होतात. तसेच अनेकदा केस सुकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रायरमुळे केस तुटू लागतात.

हिवाळ्यात थंड हवेमुळे केस कोरडे होतात. तसेच केस शुष्क आणि निस्तेज होतात. तसेच अनेकदा केस सुकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रायरमुळे केस तुटू लागतात. अशातच केस निरोगी आणि चमकदार करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज असते. त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची अजिबात गरज नसते. तुम्ही तुमच्या घरातच हेअर मास्क तयार करून केसांसाठी वापरू शकता. जाणून घेऊया काही घरगुती हेअर मास्कबाबत जे हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी मदत करतात. 

ऑलिव्ह ऑइल 

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करणं अत्यंत आवश्यक असतं. सर्वात आधी ऑलिव्ह ऑइल दोन मिनिटांसाठी गरम करा. शक्य असल्यास त्यामध्ये लव्हेंडर ऑइल एकत्र करा. आता हे संपूर्ण केसांना लावा. रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी आंघोळ करताना धुवून टाका. 

आलं 

केस गळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कोंडा. जर केसांमधील कोंडा दूर झाला तर केस गळण्याची समस्या दूर होते. या कामात आलं तुमची मदत करतं. आल्याचा एक तुकडा घेऊन त्याचा रस काढून घ्या. त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. आता तयार मिश्रण डोक्याच्या त्वचेलालावून मसाज करा. साधारणतः 45 मिनिटांसाठी ठेवा. केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होईल. 

दूध आणि मध 

दूध आणि मध एकत्र करून एक हेअर पॅक तयार करा. त्यासाठी दोन चमचे मध एक कप दूधामध्ये एकत्र करून मिक्स करा. त्यानंतर केसांना लावा आणि अर्ध्या तासासाठी तसचं ठेवा. (टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी