हिवाळ्यात केसांसाठी फायदेशीर ठरतात 'हे' हेअर मास्क; असे करा तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 16:30 IST2019-10-12T16:30:00+5:302019-10-12T16:30:29+5:30
हिवाळ्यात थंड हवेमुळे केस कोरडे होतात. तसेच केस शुष्क आणि निस्तेज होतात. तसेच अनेकदा केस सुकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रायरमुळे केस तुटू लागतात.

हिवाळ्यात केसांसाठी फायदेशीर ठरतात 'हे' हेअर मास्क; असे करा तयार
हिवाळ्यात थंड हवेमुळे केस कोरडे होतात. तसेच केस शुष्क आणि निस्तेज होतात. तसेच अनेकदा केस सुकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रायरमुळे केस तुटू लागतात. अशातच केस निरोगी आणि चमकदार करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज असते. त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची अजिबात गरज नसते. तुम्ही तुमच्या घरातच हेअर मास्क तयार करून केसांसाठी वापरू शकता. जाणून घेऊया काही घरगुती हेअर मास्कबाबत जे हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी मदत करतात.
ऑलिव्ह ऑइल
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करणं अत्यंत आवश्यक असतं. सर्वात आधी ऑलिव्ह ऑइल दोन मिनिटांसाठी गरम करा. शक्य असल्यास त्यामध्ये लव्हेंडर ऑइल एकत्र करा. आता हे संपूर्ण केसांना लावा. रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी आंघोळ करताना धुवून टाका.
आलं
केस गळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कोंडा. जर केसांमधील कोंडा दूर झाला तर केस गळण्याची समस्या दूर होते. या कामात आलं तुमची मदत करतं. आल्याचा एक तुकडा घेऊन त्याचा रस काढून घ्या. त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. आता तयार मिश्रण डोक्याच्या त्वचेलालावून मसाज करा. साधारणतः 45 मिनिटांसाठी ठेवा. केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होईल.
दूध आणि मध
दूध आणि मध एकत्र करून एक हेअर पॅक तयार करा. त्यासाठी दोन चमचे मध एक कप दूधामध्ये एकत्र करून मिक्स करा. त्यानंतर केसांना लावा आणि अर्ध्या तासासाठी तसचं ठेवा.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)