​कोंडा घालविण्यासाठी घरगुती उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 19:38 IST2016-03-28T02:38:57+5:302016-03-27T19:38:57+5:30

केसाममध्ये  होणारी सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती कोंडा आहे

Home remedies for wearing bran | ​कोंडा घालविण्यासाठी घरगुती उपचार

​कोंडा घालविण्यासाठी घरगुती उपचार

 
ोंड्यामुळे केस गळायला सुद्धा लागतात. निरोगी केसासाठी त्याच्यावर उपचार घेणे गरजेचे आहे. या कोंड्याला  कमी करण्यासाठी घरगुती उपचार खूप महत्वाचे आहेत. 
अंडी : दोन अंडी फ ोडून कोमट पाण्यात टाक ावी व ते केसांना लावून घ्यावे. २० मिनीटे ठेवल्यानंतर केसांना चांगले धुवून काढावे. दोन आठवड्यातच यामुळे कोंडा कमी होऊ शकतो. अंडी लावल्यानंतर डोक्याला शॉवर कॅपने झाकून घ्यावे. यामुळे अंडे हे त्वचापर्यत जाऊन, केसातील घाण बाहेर काढते. अंड्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्याने केस मजबूत होतात. व त्यामुळे कोंडा होण्याची शक्यता राहत नसून, केसांची वाढही चांगली होते. 
मेथी पेस्ट : मेथीचे दाणे हे रात्रभर भिजवून  त्याचा पेस्ट केसांना चांगला लावावा. एक तास केसांना तो पेस्ट राहू द्यावा. त्यानंतरला केस धुवून काढावेत. त्यामुळे कोंडा हा होत नाही. 
दही : आंघोळ करण्याच्या अगोदर एक तास दही हे केसांना लावून घ्यावे. त्यामुळे केसांना चमक येतो. व कोंडा होण्याचीही धोका राहत नाही.
आद्रक : आद्रकेचा रस केसांना लावला तर त्याने सुद्धा डोक्यात कोंडा होत नाही. 

Web Title: Home remedies for wearing bran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.