चष्म्यामुळे नाकावर झालेले डाग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 15:56 IST2018-07-17T15:56:06+5:302018-07-17T15:56:25+5:30
बदलती जीवनशैली आणि गॅजेट्सचा अति वापर यांमुळे अनेक लोकांना डोळ्यांच्या तक्रारी उद्भवतात. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेचजण टी.व्ही, कम्प्यूटर आणि स्मार्टफोन यांच्यासोबत जास्त वेळ घालवतात.

चष्म्यामुळे नाकावर झालेले डाग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय!
बदलती जीवनशैली आणि गॅजेट्सचा अति वापर यांमुळे अनेक लोकांना डोळ्यांच्या तक्रारी उद्भवतात. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेचजण टी.व्ही, कम्प्यूटर आणि स्मार्टफोन यांच्यासोबत जास्त वेळ घालवतात. त्यामुळे कमी वयातच लोकांना चष्मा लागतो. अनेक वेळा असे दिसून येते की, बराचवेळ चष्मा लावल्याने नाकावर फ्रेमचा दबाव येतो आणि नाकावर व्रण उमटतात. हे व्रण चष्मा काढल्यानंतर विचित्र दिसतात. हे व्रण घालवण्यासाठी काही घरगुती टिप्स जाणून घेऊयात...
संत्र्याची साल
संत्र्याची साल यावर उपाय म्हणून वापरता येईल. यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि व्रण सहज दूर करता येतात. यासाठी संत्र्याच्या साली उन्हामध्ये सुकवाव्यात. त्यानंतर त्यांची बारिक पावडर तयार करावी. त्यानंतर ही पावडर दुधामध्ये मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट नाकावरील व्रणावर लावावी. तसेच या पावडरमध्ये बदामाचे तेल मिक्स करून तुम्ही स्क्रबर तयार करू शकता. यामुळे त्वचेवरील डेड सेल्स साफ होतील आणि चेहऱ्यावरील डाग आणि व्रण नाहीसे होण्यास मदत होईल.
काकडी
प्रत्येक सीझनमध्ये काकडी सहज उपलब्ध होते. काकडीच्या मदतीनेही चेहऱ्यावरील डाग सहज दूर करता येतात. यासाठी एका काकडीचे छोटे छोटे तुकडे करा आणि डाग अथवा व्रण असलेल्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं मसाज करा. थोड्या वेळाने थंड पाण्याने तोंड धुवून घ्या. जर तुमचे डोळे कंप्यूटरवर काम करून थकले असतील तर डोळ्यांना आराम देणं गरजेचं आहे. त्यावेळी काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवा, आराम मिळेल.
लिंबाचा रस
लिंबाचा रस हे एक नैसर्गिक क्लिंजरचे काम करते. हे चेहऱ्यावरील डाग आणि डार्क स्पॉट्स कम करतं. चष्म्यामुळे झालेले व्रण दूर करण्यासाठी एक चमचा लिंबाच्या रसामध्ये अर्धा चमचा पाणी टाका. कापसाच्या मदतीने हे मिश्रण त्या डागावर लावा.
बदामाचे तेल
बदामाच्या तेलामध्ये अनेक पौष्टीक तत्व असतात. जे त्वचेला पोषण देतात आणि तिला मॉश्चराइज करतात. बदामाचे तेल चेहऱ्यावरील डाग दूर करतात.