Split ends मुळे हैराण आहात?; हे घरगुती मास्क ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:26 IST2019-03-29T15:23:47+5:302019-03-29T15:26:24+5:30
उन्हाळ्यामध्ये केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसा सूर्याच्या प्रखर किरणांचा आरोग्यावर आणि त्वचेवर परिणाम होत असतो. तसाच तो केसांवरही होत असतो.

Split ends मुळे हैराण आहात?; हे घरगुती मास्क ट्राय करा
(Image Credit : highya.com)
उन्हाळ्यामध्ये केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसा सूर्याच्या प्रखर किरणांचा आरोग्यावर आणि त्वचेवर परिणाम होत असतो. तसाच तो केसांवरही होत असतो. परिणामी केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. केस कोरडे होणं, केस गळणं तसेच केस दुभंगणं यांसारख्या समस्यांमुळे केसांचं सौंदर्य नष्ट होतं. या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. तसेच बाजारात मिळणाऱ्या महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचाही वापर करण्यात येतो. अशातच केस दुभंगण्याच्या समस्येमुळेकेस फार खराब होतात. अशातच काही घरगुती उपायांनी तुम्ही केसांच्या सर्व समस्या दूर करू शकता. जाणून घेऊया दुभंगलेले केसांची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱया उपायांबाबत...
सुंदर केसांसाठी स्वस्त आणि सोपे उपाय असून यामध्ये वापरण्यात येणाऱ्या गोषटी घरीच सहज उपलब्ध होतात. जाणून घेऊया या सर्व उपायांबाबत...
एग मास्क
अंडे केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करतात. एग मास्क केसांना पोषण देण्याचं काम करतात. अंड्याच्या पांढरा भाग घेऊन त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. तयार मास्क केसांना जवळपास अर्धा तासांसाठी लावा. त्यानंतर शॅम्पूच्या मदतीने केस व्यवस्थित धुवून घ्या.
हॉट ऑइल मसाज
दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करण्यासाठी अनेक ट्राइड अॅन्ड टेस्टेड उपाय आहे. नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल थोडंसं गरम करून स्काल्पला मसाज करा. तेल जवळपास एक तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर कोमट पाणी आणि शॅम्पूच्या मदतीने धुवून टाका.
बदमाचे तेल
खोबऱ्याचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइलऐवजी बदामाचं तेल वापरू शकता. 4 ते 6 चमचे बदामाचे तेल एका बाउलमध्ये घेऊन थोडं गरम करा. या गरम तेलाने स्काल्पला मसाज करा. ह तुम्ही 1 ते 2 तासांपासून रात्रभरही तसचं ठेवू शकता. त्यानंतर केस धुण्यासाठी एखाद्या हर्बल शॅम्पूचा वापर करा.
हनी मास्क
आपल्या नॅचरल तत्वांमुळे मध केस दुभंगण्याची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. मध आणि दही एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आमि केसांना लावा. अर्ध्या तासांपर्यंत हा मास्क केसांना लावून ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूच्या मदतीने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.