चमकदार, लांब अन् सुंदर केसांसाठी रामबाण उपाय ठरतो कांदा, वाचा काही बेस्ट घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:36 AM2020-03-10T11:36:34+5:302020-03-10T11:41:34+5:30

काही खास घरगुती उपायांनीही लांब आणि सुंदर केस मिळवता येतात. लांब आणि सुंदर केसांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कांद्याची मदत होते. 

Ho to use onion get long strong and beautiful hair api | चमकदार, लांब अन् सुंदर केसांसाठी रामबाण उपाय ठरतो कांदा, वाचा काही बेस्ट घरगुती उपाय!

चमकदार, लांब अन् सुंदर केसांसाठी रामबाण उपाय ठरतो कांदा, वाचा काही बेस्ट घरगुती उपाय!

googlenewsNext

आता वातावरण जरा तापायला लागलं आहे. त्यामुळे त्वचा आणि केसांची काळजी जरा अधिक घ्यावी लागणार आहे. यात दिवसात त्वचेसोबतच केसांच्या अनेक समस्या होतात. केसांमध्ये घामामुळे डॅंड्रफची समस्या होते. त्यामुळे केसगळतीची समस्याही होते. मग काय अनेकजण सुंदर, चमकदार केसांसाठी लोक महागडे शॅम्पू, घरगुती उपाय आणि डॉक्टरांच्या मदतीने यासाठी उपचार घेतात. पण काही खास घरगुती उपायांनीही लांब आणि सुंदर केस मिळवता येतात. लांब आणि सुंदर केसांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कांद्याची मदत होते. 

कांद्यामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात आढळतं. जे केसगळतीला रोखण्यासाठी मदत करतं. सल्फरसोबतच कांद्यामध्ये आयर्न आणि फायबरही असतं. तसेच व्हिटॅमिन ए, बी - 6, सी आणि ई सोबतच पोटॅशिअमही असतं. चला जाणून घेऊ कांद्याचे केस वाढवण्यासाठीचे फायदे..

1) कांदा आणि बीअर

एका वाटीमध्ये दोन चमचे कांद्यांचा रस आणि 2 चमचे बीअर मिश्रित करा. हे मिश्रण स्कॅल्पवर लावा आणि 30 मिनिटे तसेच ठेवल्यावर शॅम्पू करा. एकदाच केस धुतल्याने केस मुलायम आणि चमकदार होतील. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास हळूहळू केसगळती कमी होते. 

2) कांदा आणि मध

2 चमचे कांद्याच्या रसात एक चमचा मध मिश्रित करा. ही पेस्ट स्कॅल्पवर आणि केसांवर लावा. साधारण 30 मिनिटांनी केस धुवा. यानेही केस आणखी मजबूत होतील.

3) कांदा आणि दही

जर तुम्हाला केसगळतीची समस्या अधिक जास्त होत असेल तर कांद्याच्या रसात दोन चमचे दही मिश्रित करा. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा. याने केसगळती कमी होईल आणि केस मुलायम होतील. 

4) कांदा आणि खोबऱ्याचं तेल

2 चमचे खोबऱ्याच्या तेलात एक चमचा कांद्याचा रस मिश्रित करा. हे मिश्रण स्कॅल्पवर आणि केसांवर लावा. हे मिश्रण रात्रभर तसेच लावलेले ठेवा आणि सकाळी केस धुवा.

5) कांदा आणि लिंबू

2 चमचे कांद्याच्या रसात एक चमचा लिंबूचा रस मिश्रित करा. हे मिश्रण केसांवर लावा आणि एक तासानंतर केस स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करा. याचा लगेच फायदा दिसेल.


Web Title: Ho to use onion get long strong and beautiful hair api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.