आरोग्याला लाभदायक ‘स्टॅटिक सायकलिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:35 IST2016-04-07T23:35:17+5:302016-04-07T16:35:17+5:30

स्टॅटिक सायकलिंग चार भिंतींच्या आत आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखीखाली करता येत असल्याने काही आजार असलेल्यांना त्याचा विशेष उपयोग होतो.

Healthy 'Static Cycling' | आरोग्याला लाभदायक ‘स्टॅटिक सायकलिंग’

आरोग्याला लाभदायक ‘स्टॅटिक सायकलिंग’

्टॅटिक सायकलिंग’ म्हणजे घरातच किंवा व्यायामशाळेत सायकलिंगच्या मशीनवर केलेला व्यायाम. वजन कमी करण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतोच, पण मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या लोकांबरोबरच ज्यांचा चालताना मध्येच तोल जाऊ शकतो अशा व्यक्तींनाही स्टॅटिक सायकलिंगचा व्यायाम करता येतो.

एखाद्या अपघातात पायाचे किंवा मांडीचे हाड मोडले, तर ते बरे झाल्यावर पूर्ववत दिनक्रम सुरू होण्याच्या काळात हा व्यायाम करता येतो. बाहेर खुल्या वातावरणात सायकल चालवणे केव्हाही चांगलेच, पण स्टॅटिक सायकलिंग चार भिंतींच्या आत आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखीखाली करता येत असल्याने काही आजार असलेल्यांना त्याचा विशेष उपयोग होतो.

स्टॅटिक सायकलिंग हे आजार असलेल्या व्यक्तींनाही करता येत असले तरी मुळात सायकल चालवण्यासाठी शरीराची व्यवस्थित हालचाल करता यायला हवी. मधुमेह, हृदयविकार, गुडघेदुखी, दृष्टी अधू झाल्याने चालण्यावर मर्यादा आलेले लोक आणि स्थूल मंडळी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मशीनवर सायकल चालवण्याचा व्यायाम सुरू करू शकतात.

Web Title: Healthy 'Static Cycling'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.