HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 14:52 IST2017-02-02T12:06:42+5:302017-02-03T14:52:54+5:30
अकाली केस पांढरे होणे ही समस्या पुरुष आणि महिलावर्ग अशा दोघांमध्येही दिसून येते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक पर्याय करतो.
.jpg)
HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती !
आज प्रत्येकाचे आयुष्य ताणतणावाचे झाले आहे. त्यातच प्रदूषण आणि इतर कारणांचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. यामुळे शरीराला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. यापैकी एक समस्या म्हणजे अकाली केस पांढरे होणे. ही समस्या पुरुष आणि महिलावर्ग अशा दोघांमध्येही दिसून येते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक पर्याय करतो. आपणासही ही समस्या भेडसावत असेल तर हे सोपे उपाय करून बघा. केसांच्या आरोग्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे. त्यासाठी आवळ्याचा उपयोग करुन पिकलेल्या केसांपासून मुक्ती मिळवू शकता.
काय कराल-
* केस पांढरे असतील व खूप गळत असतील तर आवळा व बीट यांची पेस्ट बनवून केसंना लावा. एक महिना नियमित लावल्याने फरक जाणवेल.
* तुमचे केस पांढरे असतील तर त्यासाठी एक चमचा आवळ्याचा रस, एक चमचा बदाम तेल व लिंबाचे काही थेंब एकत्र मिसळून हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. दुसऱ्या दिवशी केस धुवा. यामुळे हळूहळू तुमचे केस काळे होतील.
* आवळ्याचे छोटे-छोटे तुकडे करून त्यांना सावलीत वाळवा. त्यानंतर ते नारळाच्या तेलात टाकून गरम करा. आवळ्याचे तुकडे काळे व कडक होईपर्यंत गरम होऊ द्या. नंतर आपल्या केसांच्या मुळांशी लावा. यामुळे तुमचे केस चमकदार बनतील.
* थोडे आवळे घेऊन लोखंडाच्या भांड्यात भिजत घाला. तीन ते चार दिवस भिजू द्या. त्यानंतर पाण्यातून काढून पेस्ट बनवा. केसांना ब्रशच्या मदतीने लावा. दोन तासांनी केस धुवा. काही दिवस असे केल्याने केस लवकरच काळे होतील.
Also Read : हेअर कलर निवडताना !
: केसांची समस्या भेडसावतेय?
: मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !