Health & Beauty : काकडीचे आरोग्य आणि सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 12:15 IST2017-07-12T06:45:34+5:302017-07-12T12:15:34+5:30
बहुतेक सेलेब्सच्या डायट प्लॅनमध्ये काकडीचा समावेश असतो. जाणून घ्या काकडीचे फायदे..!
.jpg)
Health & Beauty : काकडीचे आरोग्य आणि सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत का?
प वसाळ्यात सहज उपलब्ध होणारी काकडी आरोग्यासाठी आणि सौंदर्य खुलविण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे बहुतेक सेलेब्सच्या डायट प्लॅनमध्ये काकडीचा समावेश असतो. कमी फॅट आणि कॅलरीजने भरपूर अशा या काकडीचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते. काकडीचे सेवन आपण बऱ्याच प्रकारे करु शकतो, जसे कोशिंबीर, ज्यूस, सॅँडवीच किंवा मीठ लावूनही सेवन करु शकता. काकडीमध्ये अगणित आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म आहेत.

* आयुर्वेदानुसार काकडी, पित्त, रक्त पित्त दूर करणारा तसेच रक्तविकार आणि मूत्र कच्छ नाशक रूचकर फळ आहे. काकडीच्या सेवनाने पोट आणि यकृताची जळजळ शांत होण्यास मदत होते.
* पोटात जळजळ झाल्यास तोंडात दुर्गंधी निर्माण होते. मात्र काकडी सेवन केल्याने पोटात थंडावा निर्माण होतो आणि दुर्गंधीची समस्या दूर होते.
* काकडीमध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात नसतो. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी खूपच फायदेशीर ठरतो.
* काकडीमध्ये कॅलरी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यासाठी दुपारी भूक लागल्याने काकडीचे सेवन केल्यास पोट उशिरापर्यंत भरलेले असते.
* जर तोंडात दुर्गंधी येत असेल तर आपण काही वेळापर्यंत तोंडात काकडीचा तुकडा ठेवल्यास तोंडातील जीवाणू नष्ट होऊन हळुहळू तोंडाची दुर्गंधी दूर होते.