केसांच्या सौंदयार्साठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 12:54 IST2016-12-25T12:52:40+5:302016-12-25T12:54:40+5:30

स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या केशरचनेवर अवलंबून असते. उत्तम व योग्य केसांच्या ठेवणीमुळे त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. मात्र, बहुतांश महिलांना धकाकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या सुंदर केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही.

Hairstyles for hair! | केसांच्या सौंदयार्साठी!

केसांच्या सौंदयार्साठी!

त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या केशरचनेवर अवलंबून असते. उत्तम व योग्य केसांच्या ठेवणीमुळे त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. मात्र, बहुतांश महिलांना धकाकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या सुंदर केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. यामुळे केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य आहार आणि केसांची योग्य देखरेख घेणे गरजेचे असते.
 


केसांच्या सौंदयार्साठी केसांची काळजी कशी घ्यावी याबाबत काही टिप्स देत आहोत. 

* योग्य आहार- केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी संतुलित आहार अत्यावश्यक असतो. भाजीपाला, बदाम, मासे, नारळ आदींचा आहारात समावेश असावा. यामुळे केस चांगले राहण्यास मदत होईल. 
* तेलाने मालिश करा- केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन इ. युक्त तेल महत्त्वाचे आहे. असे तेल केसांमध्ये सुमारे एक तास मुरले पाहिजेत, त्यामुळे तेल केसांच्या मुळापर्यंत जाण्यास मदत होते. कोणत्याही तेलाने केस वाढतात असे नाही, बदाम तेल केसांसाठी उपयुक्त आहे. शिवाय डोक्यावर कोमट तेलाने मालिश करावी आणि गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलने डोके झाकून घ्यावे. त्यामुळे केसांना वाफ मिळते. 
* केसांची स्वच्छता राखा- आपले केस लांब असतील तर आठवड्यातून दोन वेळा नक्की धुवावेत. कारण जसे केसांना तेल लावणे आवश्यक आहे, तशी केसांची स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची आहे. यामुळे केसांच्या मुळांना आॅक्सिजन मिळतो व केस सुंदर होतात. 
* केसांना बांधून ठेवणे- प्रवासादरम्यान केस बांधून ठेवावेत. कारण प्रदूषण, धूळ, माती आणि हवा याचा विपरित परिणाम आपल्या केसांवर होत असतो. 

Web Title: Hairstyles for hair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.