घरच्या घरी केस स्ट्रेट करण्याच्या सोप्या टिप्स, पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 10:39 IST2020-01-18T10:34:14+5:302020-01-18T10:39:40+5:30
स्ट्रेट केस कोणत्याही प्रकारच्या आउटफिटवर सूट करतात. साधारणपणे केस स्ट्रेट करण्यासाठी महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात.

घरच्या घरी केस स्ट्रेट करण्याच्या सोप्या टिप्स, पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज!
स्ट्रेट केस कोणत्याही प्रकारच्या आउटफिटवर सूट करतात. साधारणपणे केस स्ट्रेट करण्यासाठी महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात. पण काही महिलांना केमिकलच्या वापराने केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळे या समस्या टाळायच्या असतील तर तुम्ही घरच्या घरीच केस स्ट्रेट करू शकता. त्यातल्या त्यात हे उपाय नैसर्गिक असल्याने याचे काही साइड इफेक्टही नाहीत.
गरम तेल
केस स्ट्रेट करण्यासाठी कोमट तेल फायदेशीर ठरतं. रोज केसांना तेल लावल्याने केस सरळ होतात. गरम तेलाने कर्ली झालेले केस सरळ होतात. जर तुम्ही खोबऱ्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाचं तेल वापराल तर अधिक फायदा होईल. तिळाचं तेलही यासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी तेल थोडं गरम करा. नंतर केसांना लावून १५ ते २० मिनिटे मसाज करा. साधारण अर्ध्या तासाने एखाद्या माइल्ड शॅम्पूने केस धुवावे.
मुलतानी मातीची पेस्ट
मुलतानी मातीचा वापर पूर्वीपासून होतो आहे. याने केस नैसर्गिकपणे स्ट्रेट होतात. यासाठी मुलतानी मातीमध्ये अंड्याचा पांढरा भाग मिश्रित करा, त्यात थोडं तांदळाचं पीठही घाला. याची एक घट्ट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा. त्यावरून मोठ्या दातांचा कंगवा फिरवा. नंतर १ तासाने केस स्वच्छ करा. यावर दुधाचा स्प्रे करा. १५ मिनिटे दूध तसंच राहू द्या. काही वेळात केस स्ट्रेट होऊ लागतील.
कोकोनट मिल्क आणि लेमन ज्यूस
कोकोनट मिल्क लेमन ज्यूस एका वाटीमध्ये व्यवस्थित मिश्रित करून काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर हे मिश्रण केसांवर मास्कसारखं लावा. साधारण १५ ते २० मिनिटांनी केसांना स्टीम द्या. नंतर केस एखाद्या चांगल्या किंवा तुम्ही नेहमी वापरता त्या शॅम्पूने धुवावे. केस सुकल्यानंतर स्ट्रेट होतील. तसेच केस चमकदारही होतील.
बेसन, मुलतानी माती आणि अॅपल व्हिनेगर
बेसन, मुलतानी माती आणि अॅपल व्हिनेगरचं मिश्रण तयार करा. ही पेस्ट १० ते १५ मिनिटे केसांना लावून ठेवा आणि नंतर केस शॅम्पूने धुवावे. केस स्ट्रेट होतील.