हेअर रिमूव्हल क्रीम लावतांय-सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 15:59 IST2017-01-12T15:59:52+5:302017-01-12T15:59:52+5:30

शरीरावरील नको असलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी घरगुती उपाय किंवा वॅक्सिंग सारखे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे घरगुती उपाय.

Hair Removal Cream- Be careful! | हेअर रिमूव्हल क्रीम लावतांय-सावधान !

हेअर रिमूव्हल क्रीम लावतांय-सावधान !

ong>-रवीन्द्र मोरे 

शरीरावरील नको असलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी घरगुती उपाय किंवा वॅक्सिंग सारखे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे घरगुती उपाय. मात्र याकडे आपण दुर्लक्ष करुन वॅक्सिंग किंवा हेअर रिमूव्हल क्रिमचा पर्याय अवलंबितो. असो ही आपली आवड-निवड असू शकते, मात्र आपण हात किंवा अंडरआर्मच्या केसांना काढण्यासाठी जर हेअर रिमूव्हल क्रिमचा वापर करत असाल तर आपण सावध व्हायला हवे. हा पर्याय आपल्या त्वचेसाठी समस्या निर्माण करु शकतो. एका संशोधनात हेअर रिमूव्हल क्रिमचे काही साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत.
 
* पुरळ होण्याची समस्या
पुरळ होण्याची समस्या कित्येकदा वॅक्सिंग केल्यानंतरही उद्भवते, मात्र हेअर रिमूव्हल क्रिममधील केमिकल्समुळे ही समस्या अधिक वाढीस लागते. जर आपली त्वचा संवेदनशील आहे, तर ही समस्या अजून जास्त वाढू शकते. 

डार्क स्कीन
हेअर रिमूव्हलच्या जास्त वापराने आपली स्कीन डार्क पडू शकते. यात असलेल्या केमिकल्सचा आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होत असतो. ही समस्या शक्यतो अंडरआर्ममध्ये जास्त पाहावयास मिळते. तिथे पाहून असे वाटते की आपल्याला टॅनिंग झाले आहे. 

* इतर अवयवांनाही धोका
या हेअर रिमूव्हल क्रिमवर स्पष्ट लिहिले असते की, याला डोेळे आणि आयब्रोसारख्या बाकी अवयवांपासून लांब ठेवा. यात असलेले केमिकल्स या अवयवांसाठी खूप धोकेदायक असतात. यामुळे याचा वापर शरीराच्या इतर अवयवांसाठी घातक ठरु शकतो.

* रफ स्कीन
हेअर रिमूव्हल क्रिमचा वारंवार वापर केल्याने काही काळानंतर आपल्या लक्षात आले असेल की आपले केस अगोदरपेक्षा जास्त कडक आणि रुक्ष झाले असतील शिवाय स्कीनदेखील रफ झालेली असेल. 

* अ‍ॅलर्जी आणि रिअ‍ॅक्शन 
जर आपली स्कीन संवेदनशील असेल तसेच जळणे किंवा कापल्याची समस्या असेल तर चुकूनही हेअर रिमूव्हल क्रिमचा वापर करु नका. अशा परिस्थितीत आपल्याला अ‍ॅलर्जी आणि रिअ‍ॅक्शन होण्याचा धोका होऊ शकतो. कित्येकदा यात असलेल्या केमिकल्समुळे रिअ‍ॅक्शनचा त्रासही सोसावा लागतो.  

Web Title: Hair Removal Cream- Be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.