(Image Credit : inquirer.com)

सतत फॅशन ट्रेन्ड्स फॉलो करणाऱ्या आणि सतत आपल्या लूक्ससोबत प्रयोग करणाऱ्या महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जर तुम्ही नेहमीच हेअरस्टाइलवर नवनवीन प्रयोग करत असाल आणि त्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करत असाल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका अधिक पटीने वाढतो.

'International Journal of Cancer' मध्ये नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ज्या महिला हेअर डाय आणि केमिकल हेअर स्टेटनर्सचा नियमित वापर करत असाल तर त्यांना कॅन्सर होण्याचा धोका असं न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत अनेक पटीने वाढतो. खास बाब ही आहे की, ही समस्या त्या महिलांसाठी अधिक घातक आहे ज्यांचा स्किन टोन डार्क आहे. आफ्रिकन अमेरिकन महिला याच्या जास्त शिकार होतात.

रिसर्चनुसार ज्या महिला नियमित हेअर स्ट्रेटनर आणि हेअर डायचा वापर करतात त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका अधिक पटीने वाढतो. लागोपाठ ८ वर्ष रिसर्च करणाऱ्या अभ्यासकांचं मत आहे की, पर्मनन्ट हेअर डाय वापरणाऱ्या व्हाईट स्किन महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका इतर महिलांच्या तुलनेत ७ टक्के अधिक असतो. तर डार्क स्किन टोन असलेल्या महिलांमध्ये हा धोका ४५ टक्के अधिक असतो. इतकेच नाही तर ज्या महिला दर महिन्यात किंवा दर दोन महिन्यात रेग्युलर पद्धतीने हेअर डायचा वापर करतात, त्यांच्यातही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.

याबाबत अभ्यासकांनी ४६ हजार ७०९ महिलांवर रिसर्च केला. या सर्वच महिलांचं वय ३५ते ७४ वर्षा दरम्यानचं होतं. याआधी करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं होतं की, अशाप्रकारच्या आजाराच्या शिकार सामान्यपणे व्हाईट स्किन महिला होतात, पण आता करण्यात आलेल्या रिसर्चनुसार समोर आले आहे की, या महिलांमधील ९ टक्के महिला या आफ्रिकन अमेरिकन आहेत. 

अभ्यासकांचं मत आहे की, हेअर प्रॉडक्ट तयार करण्यासाठी साधारण ५ हजारपेक्षा अधिक केमिकल्सचा वापर केला जातो. यातील अनेक केमिकल्समध्ये असे तत्व असतात, ज्याने कॅन्सर तयार करणारे तत्व असतात. ताज्या रिसर्चनुसार, हेअर स्ट्रेटनिंग करणाऱ्या ३० टक्के महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. मग त्यांना स्किन टोन डार्क असो वा व्हाईट.


Web Title: Hair Dyes and Straighteners May Raise Breast Cancer Risk for Black Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.