फक्त 'या' ट्रिक्स वापरून पुरूषांना लॉकडाऊनमध्येही केसांचं सौंदर्य येईल खुलवता  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:34 PM2020-04-30T17:34:00+5:302020-04-30T17:40:49+5:30

सेल्फ क्वारंटाईन असूनही तुम्ही तुमच्या केसांची काळजी  चांगल्या पद्धतीने घेऊ शकता.

Hair care tips for men during self quarantine myb | फक्त 'या' ट्रिक्स वापरून पुरूषांना लॉकडाऊनमध्येही केसांचं सौंदर्य येईल खुलवता  

फक्त 'या' ट्रिक्स वापरून पुरूषांना लॉकडाऊनमध्येही केसांचं सौंदर्य येईल खुलवता  

Next

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे जगभरातील लोक आपापल्या घरी आराम करत आहेत. काही लोक सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत घरी सुद्धा वावरताना दिसून येत आहेत. रोज ऑफिसला जाणारे लोक घरी बसून काम आहेत. आठवड्यातून एकदातरी पार्लर किंवा सलूनमध्ये जात असलेल्या पुरूषांना आता घरी राहण्याशिवाय पर्याय नाही. पण सेल्फ क्वारंटाईन असूनही तुम्ही तुमच्या केसांची काळजी  चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी केसांची काळजी कशी घ्यायची याबाबत सांगणार आहोत.

रोज शॅम्पूने केस धुवू नका

घरी असताना इच्छा झाली तेव्हा अंघोळ करायची असं  तुम्हालाही वाटत असेल. अंघोळ करत असताना केसांना नेहमी शॅम्पू लावू नका.  कारण रोज केसांना शॅम्पू लावल्यामुळे केस कोरडे पडण्याची शक्यता असते.  याशिवाय स्काल्पमधून नैसर्गीकरित्या येणारं तेल कमी होऊ शकतं. परिणामी केसांना पोषण मिळणार नाही. म्हणून तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदा केसांना शॅम्पू लावून धुवा.

केसांची मसाज करा

तुम्ही कितीही महागडे शॅम्पू, कंडीशनर वापरत असाल पण केसांची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला घरगुती उपायांचा वापर करावा लागेल. तेल गरम करून या कोमट तेलाने घरातील व्यक्तींना लॉकडाऊनच्या काळात तुमची हेड मसाज करून द्यायला सांगू शकता. त्यामुळे तुमचे केस  चमकदार आणि मजबूत होतील. मसाज करण्यासाठी तुम्ही बदामाचं, नारळाचं तेल वापरू शकता. (हे पण वाचा-प्रत्येक पुरुषाला हॅण्डसम लूक देतील 'हे' घरगुती फंडे, लॉकडाऊनमध्ये नक्की ट्राय करा)

हेअर स्पा

केसांच्या ट्रिटमेंट घेण्यासाठी तुम्हाला पार्लरला जाण्याची काहीही गरज नाही. सगळ्यात आधी केसांना तेल लावा.  २० मिनिटं केस तसेच राहू द्या. नंतर एक मोठा टॉवेल गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि मग केसांवर लावा.  या पध्दतीला हॉट टॉवेल टेक्निक असं म्हणतात. यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते. ही प्रोसेस झाल्यानंतर केस शॅम्पू आणि कंडिशनर लावून धुवून टाका. ( हे पण  वाचा-लॉकडाऊनमध्ये वाढलेले केस नको झालेत?, या ट्रिक्स वापरून घरच्याघरी हेअरकट करा)

Web Title: Hair care tips for men during self quarantine myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.