केसांची काळजी घेण्यासाठी थंडीमध्ये फॉलो करा 'या' टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 15:14 IST2018-10-29T15:13:16+5:302018-10-29T15:14:20+5:30
सुंदर आणि मुलायम केसांसाठी आपण अनेक उपाय करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूनुसार त्वचेप्रमाणेच केसांच्याही अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेप्रमाणे त्यांचीही काळजी घेणं गरजेचं असतं.

केसांची काळजी घेण्यासाठी थंडीमध्ये फॉलो करा 'या' टिप्स!
सुंदर आणि मुलायम केसांसाठी आपण अनेक उपाय करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूनुसार त्वचेप्रमाणेच केसांच्याही अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेप्रमाणे त्यांचीही काळजी घेणं गरजेचं असतं. सध्या थंडीची चाहूल लागली आहे. जाणून घेऊया थंडीमध्ये केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स...
केस सुकवण्यासाठी हॉट ड्रायरचा वापर करणं टाळा. केस धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. केसांसाठी शॅम्पूची निवड करताना सल्फेट फ्री आणि पीएच बॅलेन्स करणाऱ्या शॅम्पूची निवड करा. त्याशिवाय मोठे दात असलेल्या कंगव्याचा वापर करा. त्याचप्रमाणे ओले केस बांधूव ठेवू नका.
डोक्याची त्वचा कोरडी झाल्यामुळे केसांमध्ये खाज आणि कोंडा होण्याची समस्या होते. लिंबू, व्हिनेगर, आवळा, मध हे पदार्थ नैसर्गित पद्धतीने केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करतात. लिंबाचा रस, आवळ्याची पावडर आणि सफरचंदाचे व्हिनेगर एकत्र करून पेस्ट तयार करा. या पेस्टने डोक्याच्या त्वचेवर मालिश करा. 15 मिनिटांनी केस पाण्याने धुवून टाका.
अंड्याचा पांढरा भाग, मध केसांना डिप कंडिशनिंग करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अंड्याचा पांढरा भाग आणि मध एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटांसाठी केसांवर लावा. यामुळे केस नॅचरली हेल्दी होण्यास मदत होते.
कांद्याचा रस, आल्याचा रस आणि कॅस्टर ऑइल एकत्र करून पेस्ट तयार करा आणि हे मिश्रण केसांना लावा. याव्यतिरिक्त आठवड्यातून 2 ते 3 वेळा डोक्याच्या त्वचेला मसाज करा. केस गळण्याची समस्या दूर होईल.
जर तुमचे केस धुतल्यानंतर चिकट होत असतील तर शॅम्पू करण्याआधी व्हिनेगर असलेल्या पाण्याने केस धुणं फायेदशीर ठरतं. यामुळे केसांमधील अतिरिक्त तेल नाहिसं होतं.