​केसांमध्ये कोंडा झालाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 17:54 IST2016-12-23T18:10:54+5:302016-12-24T17:54:06+5:30

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या स्त्री असो की पुरुष दोघांनाही जास्त सतावते. कोंड्यामुळे मुरुमे येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, त्वचेवर दाणे येणे आदी समस्याही डोके वर काढू लागतात.

The hair is brittle! | ​केसांमध्ये कोंडा झालाय!

​केसांमध्ये कोंडा झालाय!

वाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या स्त्री असो की पुरुष दोघांनाही जास्त सतावते. कोंड्यामुळे मुरुमे येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, त्वचेवर दाणे येणे आदी समस्याही डोके वर काढू लागतात. खालील टिप्स फॉलो केल्यास नक्कीच कोंड्यापासून सुटका मिळेल. 

काय उपाययोजना कराल
एक चमचा त्रिफळा पावडर, एक चमचा खोबरेल किंवा बदामाच्या तेलामध्ये मिसळा. हे मिश्रण २-३ मिनिटे उकळून एकजीव करा व थोडे थंड होऊ द्या. केसांना आणि त्वचेला सोसवेल इतके तेल कोमट झाल्यानंतर टाळूवर हलक्या हाताने मसाज करा.

केसातील कोंडा कमी करण्यास लाकडी कंगव्याचा उपयोग होतो. लाकडी कंगव्यामुळे डोक्यावरील त्वचेमध्ये निर्माण होणारा तेलकटपणा कमी होतो. परिणामी कोंडा कमी होण्यास मदत होते.

खोबरेल तेल केसाच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि लिंबूरस केसांतील कोंडा दूर करण्यासाठी उपयोगी असते. तेल लावण्यापूर्वी अगोदर खोबरेल तेल गरम करा आणि यामध्ये लिंबूरस मिक्स करा अंघोळीच्या अगोदर २ तास हे तेल लावून मालिश करा.

जास्वंद फुलांची पेस्ट आणि नारळाचे तेल काही वेळ उकळू दया. यानंतर याला थंड होऊ दया आणि डोक्याच्या त्वचेवर लावून रात्रभर ठेवा.

Web Title: The hair is brittle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.