घरच्या घरी तयार करण्यात आलेल्या फ्रुट पॅक्सने मिळवा नॅचरल ग्लो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:39 PM2018-10-09T16:39:06+5:302018-10-09T16:43:01+5:30

पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करून घेण्यात आलेल्या केमिकल ट्रिटमेंटमुळे फक्त बाहेरून त्वचा उजळण्यास मदत होते. कधी कधी तर या ट्रिटमेंट्समुळे अनेकदा स्किनला नुकसानही पोहचू शकतं.

fruit face pack for glowing skin | घरच्या घरी तयार करण्यात आलेल्या फ्रुट पॅक्सने मिळवा नॅचरल ग्लो!

घरच्या घरी तयार करण्यात आलेल्या फ्रुट पॅक्सने मिळवा नॅचरल ग्लो!

Next

पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करून घेण्यात आलेल्या केमिकल ट्रिटमेंटमुळे फक्त बाहेरून त्वचा उजळण्यास मदत होते. कधी कधी तर या ट्रिटमेंट्समुळे अनेकदा स्किनला नुकसानही पोहचू शकतं. परंतु जर तुम्ही घरगुती उपाय ट्राय केले तर त्यामुळे स्किनला कोणतंही नुकसान पोहचू शकणार नाही. तसेच स्किन मुलायम आणि उजळलेली दिसते. अशीच नैसर्गिक ग्लो स्किन मिळवण्यासाठी घरच्या घरी फळांचा वापर करून तयार करण्यात आलेले फेस पॅक वापरा. 

केळी - 

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. यापासून तयार करण्यात आलेला फेस पॅक स्किनवरील डेड सेल्स दूर करून स्किन मुलायम बनवण्यास फायदेशीर ठरतं. यासाठी एक केळी घेऊन स्मॅश करा. त्यानंतर त्यामध्ये मध आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. 

पपई - 

पपईमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट, फ्लोवोनॉइड्स आणि मिनरल्स असतात. हे एक नॅचरल अॅन्टीएजिंग आहे. यापासून पॅक तयार करण्यासाठी पपईचा गर काढून त्यामध्ये मध, लिंबाचा रस आणि मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हा पॅक स्किनला मुलायम करण्यास फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर स्किनवरील डेड स्किन हटवून स्किनच्या आतील लेयर्सही मुलायम करण्यास फायदेशीर ठरतो. 

स्ट्रॉबेरी - 

स्ट्रॉबेरीपासून तयार करण्यात आलेले फेस पॅक सूर्याच्या किरणांमुळे झालेल्या स्किनच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यापासून पॅक तयार करण्यासाठी याचा रस काढून त्यामध्ये दही मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हा पॅक स्किनला नैसर्गिक ग्लो देण्यासाठी फायदेशीर ठरतो. 
 
कलिंगड -

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. कारण त्यामुळे त्वचेला आतून मुलायम करण्यास मदत होते. यापासून पॅक तयार करण्यासाठी याचा रस काढून त्यामध्ये दही आणि मिल्क पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटं लावून ठेवल्यानंतर चेहरा धुवून टाका. 

संत्री -


संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं. कारण त्यामुळे स्किन हायड्रेट होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे स्किन पोर्स स्वच्छ करण्यासही मदत करतं. यापासून पॅक तयार करण्यासाठी संत्र्याचा रस काढून त्यामध्ये दही आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा धुवून घ्या. 

Web Title: fruit face pack for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.