अँटिबायोटिक्सचे चार दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:58 IST2016-01-16T01:07:09+5:302016-02-05T06:58:38+5:30

आजच्या धावपळीच्या युगात क्षणभर विश्रांती मिळवणे कठीण गोष्ट झाली आहे.

Four side effects of antibiotics | अँटिबायोटिक्सचे चार दुष्परिणाम

अँटिबायोटिक्सचे चार दुष्परिणाम

च्या धावपळीच्या युगात क्षणभर विश्रांती मिळवणे कठीण गोष्ट झाली आहे. घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगणार्‍या आजच्या काळात आजारी पडणे कोणालाही परवडण्यासारखे नाही. म्हणून मग थोडेफार जरी तब्येत ठिक नाही वाटली की लगेच अँटिबोयोटिक्स गोळ्या घेतल्या जातात. असे केल्याने थोड्या वेळासाठी जरी बरे वाटत असेल तरी त्याचे फार मोठे दूष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यापैकी हे पुढील चार आहेत.. १. लठ्ठपणा : प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसून आले की अँटिबायोटिक्समुळे चरबी वाढते. मानवामध्येसुद्धा अँटिबायोटिक्समुळे लठ्ठपणा येऊ शकतो.
२. मधुमेह : अँटिबायोटिक्स आतड्यामधील बॅक्टेरिआ मारतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन टाईप-१ प्रकारचा मधूमेह होण्याचा धोका वाढतो.
३. एच-पायलोरीचा र्‍हास : अस्थमापासून बचाव करणारा बॅक्टेरिआ एच-पायलोरी अँटिबायोटिक्समुळे मारला जातो. त्यामुळे अस्थमा होऊ शकतो.
४. अँटिबायोटिक्सला विरोध : मोठय़ा प्रमाणात अँटिबायोटिक्स घेण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे यामुळे शरीरात त्यांचा परिणाम निष्प्रभ करण्याची क्षमता तयार होते.

using antibiotics

Web Title: Four side effects of antibiotics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.