लठ्ठपणामुळे कॅन्सरची अधिक भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:34 IST2016-02-05T07:04:06+5:302016-02-05T12:34:06+5:30

लठ्ठपणा हाच मुळात एक आजार आहे. मात्र, लठ्ठपणामुळे आणखी काही आजारांना आमंत्रण मिळू शकतं. अमेरिकेतील एका संशोधनानुसार, लठ्ठ व्यक्तींना सुडौल व्यक्तींपेक्षा कॅन्सरचा धोका 50 टक्के अधिक असतो. कोलोरेक्टल कॅन्सर पोट आणि आतड्यांचा कॅन्सर म्हणूनही ओळखला जातो.अमेरिकेच्या फिलाडेल्फियामधील थॉमस जेफरसन यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक स्कॉट वाल्डमन यांच्या माहितीनुसार, आमच्या संशोधनानुसार, लठ्ठ व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा उपचार हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीच्या सहाय्यतेनी केलं जातं.संशोधकांनी लायनोक्लोटाईड औषधाचा शोधही लावला आहे. या औषधामुळे कॅन्सरला रोखण्यास यश मिळू शकतं. लठ्ठ व्यक्तींसाठी कोलोरेक्टल कॅन्सरही हे औषध उपयोग पडू शकतं.संशोधकांच्या मतानुसार, लठ्ठपणामुळे ग्वानिलीन हॉर्मोन कमी होतात. हे हॉर्मोन आतड्यांच्या एपिथिलियम कोशिकांद्वारे तयार होत असतात. लायक्लोटाईड औषध लठ्ठपणाग्रस्त व्यक्तींच्या ट्युमरला दाबणारं हॉर्मोन रिसेप्टर्सना सक्रीय करुन कॅन्सरला रोखू शकतं.  

Fear of cancer due to obesity | लठ्ठपणामुळे कॅन्सरची अधिक भीती

लठ्ठपणामुळे कॅन्सरची अधिक भीती

्ठपणा हाच मुळात एक आजार आहे. मात्र, लठ्ठपणामुळे आणखी काही आजारांना आमंत्रण मिळू शकतं. अमेरिकेतील एका संशोधनानुसार, लठ्ठ व्यक्तींना सुडौल व्यक्तींपेक्षा कॅन्सरचा धोका 50 टक्के अधिक असतो. कोलोरेक्टल कॅन्सर पोट आणि आतड्यांचा कॅन्सर म्हणूनही ओळखला जातो.अमेरिकेच्या फिलाडेल्फियामधील थॉमस जेफरसन यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक स्कॉट वाल्डमन यांच्या माहितीनुसार, आमच्या संशोधनानुसार, लठ्ठ व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा उपचार हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीच्या सहाय्यतेनी केलं जातं.संशोधकांनी लायनोक्लोटाईड औषधाचा शोधही लावला आहे. या औषधामुळे कॅन्सरला रोखण्यास यश मिळू शकतं. लठ्ठ व्यक्तींसाठी कोलोरेक्टल कॅन्सरही हे औषध उपयोग पडू शकतं.संशोधकांच्या मतानुसार, लठ्ठपणामुळे ग्वानिलीन हॉर्मोन कमी होतात. हे हॉर्मोन आतड्यांच्या एपिथिलियम कोशिकांद्वारे तयार होत असतात. लायक्लोटाईड औषध लठ्ठपणाग्रस्त व्यक्तींच्या ट्युमरला दाबणारं हॉर्मोन रिसेप्टर्सना सक्रीय करुन कॅन्सरला रोखू शकतं.  

Web Title: Fear of cancer due to obesity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.