कर्कश आवाजाने वाढतात फॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:45 IST2016-02-12T15:45:14+5:302016-02-12T08:45:14+5:30

हा त्रास फक्त डोकेदुखीपुरताच मर्यादित नसतो. यामुळे फॅटसुद्धा साठून राहते, परिणामी स्थुलतेची समस्या येते

Fat blossom grow | कर्कश आवाजाने वाढतात फॅट

कर्कश आवाजाने वाढतात फॅट

ong>घरातून बाहेर पडतो की नाही, लगेचच आपल्या कानावर गाड्यांचे कर्कश आवाज पडतात. मग ते छोटे गाव असो किंवा मोठे शहर, अशा सततच्या आवाजाने आपल्याला बाहेर थांबणे नकोसे होते. रोज प्रवास करणाºयांच्या बाबतीत तर ही डोकेदुखीच होऊन बसते.

हा त्रास फक्त डोकेदुखीपुरताच मर्यादित नसतो. यामुळे फॅटसुद्धा साठून राहते, परिणामी स्थुलतेची समस्या येते, असे स्वीडनमधील पर्यावरण संस्थेने केलेल्या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.समजा, आपली ऐकण्याची क्षमता 45 डेसीबल आहे. तर त्यामध्ये 5 डेसीबल वाढ झाल्यास स्त्रियांच्या कंबरेचा घेर 0.21 टक्कने वाढतो. म्हणजेच या लेवलमुळे बॅड फॅट्स वाढतात.

ही वाढ पुरुषांच्यात मात्र .016% असल्याचे जाणवले. जवळपास 6000 पुरुष आणि स्त्रियांवर अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले. पण, ट्राफिक नॉइजचा फॅट वाढण्यामध्ये काय संबंध आहे? आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नर्व्ह सेंटर असते. हा एकसारखा येणारा आवाज या सेंटरला अडथळा निर्माण करतो. त्यामुळे कॉर्टिसोलचे प्रोडक्शन वाढते. या केमिकलमुळे कंबरेभोवती बॅड फॅट निर्माण होण्याचे प्रमाण आणखी वाढते. त्यासाठी यावर उपाय म्हणून रोज व्यायाम करावा आणि पोषणतत्त्वेयुक्त आहार घ्यावा.

Web Title: Fat blossom grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.