Fashion : करिना कपुरसारखीच मीरा राजपूतही आहे साड्यांची दिवानी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 13:45 IST2017-06-29T08:15:20+5:302017-06-29T13:45:20+5:30
मीरा विशेषत: तिच्या फेवरेट डिझायनरने डिझाइन केलेल्या साड्याच परिधान करते.

Fashion : करिना कपुरसारखीच मीरा राजपूतही आहे साड्यांची दिवानी !
ब लिवूडमध्ये साड्यांची चाहती कोण आहे, असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा करिना कपूरचे नाव आवर्जून घ्यावेसे वाटते. कारण बहुतेक ठिकाणी करिना आपल्या आवडत्या व स्टायलिश साड्यांमध्येच दिसते. करिना जशी साड्यांची दिवानी आहे, तिच्या प्रमाणेच शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतलाही साड्या खूप आवडतात.
शाहिद कपूरसोबत लग्न केल्यानंतर मीरा राजपूत सर्वात प्रसिद्ध नॉन-बॉलिवूड स्टार वाइफ म्हणून प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे मीरा राजपूत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेमध्ये असतेच. त्यापैकीच एक कारण म्हणजे तिची आकर्षक स्टाइल आणि ड्रेसिंग सेंस.
बॉलिवूडमध्ये नसूनही तिचा लुक एखाद्या ग्लॅम सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. लग्नसोहळ्यापासून पार्ट्यांपर्यंत, ती आपला हटके ड्रेसिंग सेंसमुळे वेगळीच भासते. ड्रेसेज असो किंवा डेनिम्स आणि टी-शर्ट, ही स्टायलिश सेलेब मॉम प्रत्येक प्रकारच्या आउटफिट्स पुर्णत: ग्रेस आणि कॉन्फिडेंन्ससोबत कॅरी करते. मात्र तिचे सौंदर्य सर्वात जास्त खुलते ते डिझायनर इंडियनवेयर म्हणजे साड्यांमध्ये. मीरा विशेषत: तिच्या फेवरेट डिझायनरने डिझाइन केलेल्या साड्याच परिधान करते.
लंडनमध्ये एका लग्नसोहळ्यात गेली असता मीराने याच डिझायनरने डिझाइन केलेली पिवळी साडी परिधान केली होती. बच्चन परिवाराच्या दिवाळी पार्टीमध्ये मीरा आयसी ब्लू साडीमध्ये दिसली होती. एका संगित कार्यक्रमातही मीराने येलो अनाकरली साडीमध्ये हजेरी लावली होती. शिवाय मसाबा गुप्ताच्या लग्नातही मीरा शियर साडीमध्ये दिसली होती.
Also Read : Fashion Trend : ‘साडी’..फॅशन जगतात अजूनही टिकलेले नाव...!