शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

'या' घरगुती ३ उपायांनी त्वचेवर होणारी खाज आणि जळजळ झटपट करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:11 AM

बदलत्या वातावरणासोबतच त्वचेवर खाज आणि जळजळ होण्याची समस्याही होऊ लागते. अनेकदा ही समस्या केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्समुळेही होते.

(Image Credit : health.com)

बदलत्या वातावरणासोबतच त्वचेवर खाज आणि जळजळ होण्याची समस्याही होऊ लागते. अनेकदा ही समस्या केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्समुळेही होते. अलिकडे महिला अधिक प्रमाणात पार्लरमध्ये जाणं पसंत करतात. त्वचा उजळवण्यासाठी महिला ब्लीचचा वापर करतात. ज्याने त्यांचा चेहरा स्वच्छ आणि आधीपेक्षा सुंदर दिसू लागतो. त्यासोबतच याने चेहऱ्यावरील नको असलेले केसही दूर होतात. वाढत्या  प्रदूषणामुळे त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं झालं आहे. 

प्रत्येकीच्या त्वचेसाठी ब्लीचिंग करणं चांगलं असतंच असं नाही. कारण यात वापरलं जाणारं केमिकल फार स्ट्रॉंग असतं. ज्याने त्वचेवर खाज आणि जळजळ होऊ लागते. या समस्येवर आम्ही तुम्हाला काही खास घरगुती उपाय सांगणार आहोत.

अ‍ॅलोव्हेरा

(Image Credit : bebeautiful.in)

त्वचेसाठी अ‍ॅलोव्हेरा अनेकदृष्टीने फायदेशीर असतो. याचा वापर करून तुम्ही त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या सहज दूर करू शकता. काही महिलांची त्वचा फार संवेदनशील असते आणि ब्लीचिंगनंतर खाज आणि जळजळ होऊ लागते. अशात अ‍ॅलोव्हेराच वापर केला तर तुम्हाला आराम मिळेल. जळजळ किंवा खास आली असेल तर अ‍ॅलोव्हेरा चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटे असं करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. याने तुम्हाला बरं वाटेल.

खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल ब्लीचिंगमुळे होणारी खाज शांत करण्यासाठी फार फायदेशीर असते. तुम्ही याचा वापर करून जळजळ दूर करू शकता. अशात तुम्ही जेव्हा ब्लीच कराल तेव्हा त्यानंतर चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावा. याने तुम्हाला आराम मिळेल. खोबऱ्याच्या तेलात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगस गुण भरपूर असतात. 

दूध त्वचेसाठी फायदेशीर

- दूध तर घरात असतंच. दुधाचे आरोग्याला जेवढे फायदे असतात, तेवढेच सौंदर्य खुलवण्यासाठीही आहेत. याने चेहरा खुलतो. 

- कच्च दूध आपल्या त्वचेसाठी फार फायदेशीर असतं.

- दुधाचं चेहऱ्यावर वापर केल्याने चेहऱ्याची चमक कायम राहते.

- कच्च्या दुधात प्रोटीन, कॅल्शिअम आणि चिकट तत्व भरपूर आढळतात.  जे शरीरासोबतच त्वचेचं सौंदर्यही वाढवतात.

- दूध त्वचेवर लावल्याने त्वचेवर जळजळ होत नाही आणि खाजही दूर होते.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स