चमकदार आणि मजबूत केसांसाठी महिन्यातून केवळ दोनदा करा 'हे' घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 12:10 IST2019-09-12T12:05:59+5:302019-09-12T12:10:57+5:30
केवळ पार्लर ट्रीटमेंटमुळे केस चमकदार आणि सुंदर होत नाहीत. वेळोवेळी घरीच केसांची योग्य ती काळजी घ्यावी लागते.

चमकदार आणि मजबूत केसांसाठी महिन्यातून केवळ दोनदा करा 'हे' घरगुती उपाय!
(Image Credit : FirstCry Parentin)
केस चमकदार आणि मजबूत असावे असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण केसांची पुरेशी काळजी घेण्यासाठी सगळ्यांकडेच वेळ नसते आणि ना सगळ्यांना केसांची काळजी घेण्याचे सोपे उपाय माहीत असतात. केवळ पार्लर ट्रीटमेंटमुळे केस चमकदार आणि सुंदर होत नाहीत. वेळोवेळी घरीच केसांची योग्य ती काळजी घ्यावी लागते, तेव्हा मनासारखे सुंदर केस मिळतात.
जास्त नाही केवळ दोनदा
केस तुटण्याची किंवा गळण्याची समस्या होऊ नये असं वाटत असेल किंवा सुंदर-चमकदार केस हवे असं वाटत असेल तर जास्त नाही केवळ १ महिन्यात २ वेळा एक काम नक्की करा.
काय करावे?
केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. खासकरून वातावरणानुसार केसांना योग्य त्या ट्रीटमेंटची गरज असते. तुम्ही दही, मध, लिंबू सारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून घरीच हेअर मास्क तयार करा. आणि महिन्यातून कमीत कमी दोनदा कोसांना लावा. याने केसांना हवं ते पोषण मिळेल आणि केसांची काळजीही घेतली जाईल.
तेल मालिशची कमाल
आपल्या आरोग्यासोबत केसांनाही पोषणची गरज असते. त्यासाठी केसांना तेल नक्की लावा. तुम्ही आठवड्यातून दोनदाही केसांना तेल लावलं तरी केसांना आवश्यक ते पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात.