(Image credit : daizizheng.com)
तेलकट त्वचेमुळे अनेकजण हैराण असतात. त्यामुळे बाजारात ही समस्या दूर करण्यसाठी वेगवेगळे ब्यूटी प्रॉडक्ट्सही उपलब्ध असतात. ऑइल फ्री क्लींजर्स जेल आणि क्रीम ही समस्या दूर करण्यासाठी वापरले जातात. पण याने सर्वांनाच फायदा होतो असे नाही. काहींना याचे साइड इफेक्टही सहन करावे लागतात. अशात घरीच जर काही नैसर्गिक उपाय केले तर अधिक चांगलं होईल.
प्रत्येक वातावरणात चेहऱ्यावर पिंपल्स, डाग येणे ही सामान्य समस्या आहे. तेही तुमची त्वचा तेलकट असल्यावर तर या समस्या अधिक डोकेदुखीच्या ठरतात. त्यामुळे यावर केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट वापरून समस्या अधिक वाढवण्यापेक्षा काही नैसर्गिक उपाय केले तर फायदा अधिक होईल आणि नुकसानही होणार नाही. आम्ही तुम्हाला घरीच तयार करायचे काही फेस पॅक सांगणार आहोत.
सफरचंद आणि मध
सफरचंदाच्या गरात तीन चमचे मध मिश्रित करा आणि चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांची चेहरा पाण्याने धुवा. मधाने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषलं जातं आणि ब्लॅड हेड्स व व्हाइड हेड्सच्या समस्येपासून सुटका मिळते.
ओटमील आणि अॅलोव्हेरा
अॅलोव्हेरामध्ये असलेल्या अँटी-इन्फ्लेमेटरी एलिमेंट पिंपल्स, टॅनिंग आणि इन्फेक्शन्ससारख्या तत्त्व असतात. त्यामुळे याचा वापर मेडिकल ट्रिटमेंटमध्येही केला जातो. ओटमील पावडर अॅलोव्हेरा जेलमध्ये चांगल्याप्रकारे मिश्रित करून चेहऱ्यावर मसाज करा. ३ ते ५ मिनिटांची मसाज करून पेस्ट कोरडी होऊ द्या. नंतर चेहऱ्या पाण्याने स्वच्छ करा. तेलकट त्वचेसाठी हा सर्वात चांगला उपाय मानला जातो.
केळी आणि मध
अर्ध पिकलेलं केळं स्मॅश करून त्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिश्रित करा. हे चेहऱ्यावर लावून २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यातील लिंबाचा रस नैसर्गिक क्लींजरप्रमाणे काम करतं. तसेच याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषलं जातं.
मॅंगो फेस पॅक
पिकलेल्या आंब्याच्या गराने चेहऱ्याची मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहऱ्या पाण्याने स्वच्छ करा. मॅंगो मास्कने चेहऱ्याचे पोर्स मोकळे केले जातात. त्यामुळे त्वचेला भरपूर ऑक्सिजन मिळतं.
पेपरमिंट टोनर
पेपरमिंटमध्ये असलेल्या एस्ट्रीजेंट चांगल्या टोनरसारखं काम करतं. याने पिंपल्स, खाज, टॅनिंग अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते. हा मास्क तयार करण्यासाठी पुदीन्याची पाने उकडून घ्या. थंडे झाले की, बारीक करून चेहऱ्यावर लावा.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)