नशेमुळे कमी होते चुक-बरोबर कळण्याची क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 20:44 IST2016-07-14T15:14:10+5:302016-07-14T20:44:10+5:30
नियमित ड्रग्सचे सेवन करणार्या व्यक्तीची तर चांगले-वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमतासुद्धा व्यसनामुळे कमी होते

नशेमुळे कमी होते चुक-बरोबर कळण्याची क्षमता
क ठलेही व्यसन वाईटच असते. नियमित ड्रग्सचे सेवन करणार्या व्यक्तीची तर चुक आणि बरोबर, योग-अयोग्य, चांगले-वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमतासुद्धा व्यसनामुळे कमी होते असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. नैतिकता आणि भावनांचे मुल्यांकन करणार्या मेंदूच्या भागावरच ड्रग्स आघात करतात.
अनेक वर्षांपासून ड्रग्सचे व्यसन आणि गुन्हेगारी वृत्तीचा संबंध असतो असे मानले जाते. परंतु ड्रग्समुळे मेंदूच्या विशिष्ट भागाची होणारी झीज गुन्हेगारी वृत्तीस कारणीभूत असते का याविषयी मात्र पुरेसे पुरावे नव्हते. कोकेन आणि मेथाम्फ्टेमाईन ड्रग्समुळे भल्याबुर्याची पारख करणार्या मेंदूच्या भागाला हानी पोहचते हे आमच्या संशोधनामुळे प्रथमच सिद्ध झाले आहे, अशी माहिती न्यु मेक्सिको विद्यापीठातील सॅमंथा फेडे यांनी दिली.
प्रस्तुत अध्ययनात नियमितपणे कोकेन आणि मेथाम्फ्टेमाईनचे सेवन करणार्या अमेरिकन कैद्यांच्या मेंदूची कार्यप्रणाली आणि नैतिकदृष्ट्या योग्य किंवा अयोग्यतेची निर्णयक्षमता यांचा परस्पर काही संबंध आहे का यावर संशोधन करण्यात आले. चांगले आणि वाईटातील फरक नीट न कळाल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, त्यातून समाज अमान्य कृत्य घडण्याची शक्यता जास्त असते.
संशोधकांनी न्यू मेक्सिको आणि विस्कॉन्सिन कारागृहातील १३१ ड्रग्स व्यसनाधिन आणि ८० व्यसनरहित कैद्याच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास केला. त्यांना कोणते शब्दप्रयोग योग्य आणि कोणते अयोग्य हे विचारण्यात येत असताना त्यांच्या मेंदूचे स्कॅन करून मज्जासंस्थेची कार्यप्रणाली रेकॉर्ड करण्यात आली. या माहितीच्या विश्लेषणातून वरील निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती ‘सायकोफार्माकॉलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात देण्यात आली.