कॅन्सर संशोधनाकरिता 16.67 अब्ज रुपयांचे दान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 15:18 IST2016-04-14T22:18:57+5:302016-04-14T15:18:57+5:30

शॉन पार्करने कॅन्सरवर ‘इम्युनोथेरपी’द्वारे उपचार करण्याच्या संशोधनाकरिता 250 मिलियन डॉलर्सचे अनुदान दिले आहे.

Donation of cancer worth 16.67 billion for cancer research! | कॅन्सर संशोधनाकरिता 16.67 अब्ज रुपयांचे दान!

कॅन्सर संशोधनाकरिता 16.67 अब्ज रुपयांचे दान!

लिकॉन व्हॅलीतील बिल गेट्स, मार्क  झुकेरबर्ग अशा दानशूर अब्जाधीशांच्या यादीमध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. टेक बिलेनियर शॉन पार्करने कॅन्सरवर ‘इम्युनोथेरपी’द्वारे उपचार करण्याच्या संशोधनाकरिता 250 मिलियन डॉलर्सचे (1667 हजार कोटी रु) अनुदान दिले आहे.

म्युझिक शेअरिंग सर्व्हिस ‘नॅपस्टर’चा निर्माता आणि सुरुवातीच्या काळात ‘फेसबुक’मध्ये गुंतवणूक दार व एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारा शॉन इम्युनोथेरपी सेंटरची निर्मिती करणार आहे. शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीचा वापर करून कॅन्सरवर मात मिळवण्याचा उपचार यामध्ये केला जाणार आहे. अमेरिकेती सहा कॅन्सर संशोधन संस्थांच्या मदतीने हा प्रोजेक्ट चालणार आहे.

संपूण जगभरामध्ये कर्करोगाची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. कॅन्सरवर उपचार शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जात आहे. ‘इम्युनोथेरपी’ ही युनिक उपचार पद्धती असून कॅन्सरवर नियंत्रण मिळवून लाखो लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात, असे शॉन पार्कर म्हणाला. गेल्या वर्षी त्याने ‘पार्क फाऊंडेशन’ स्थापन केली होती.

‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’नुसार एकट्या 2016 मध्ये अमेरिकेतील सुमारे सहा लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होणार आहे. याचाच अर्थ की दिवसाकाठी 1600 पेक्षा जास्त लोक कॅन्सरचे बळी ठरणार. अमेरिकेत मृत्यूला कारणीभूत आजारांमध्ये हृदयरोगानंतर कॅन्सरचा दुसरा क्रमांक लागतो.

Web Title: Donation of cancer worth 16.67 billion for cancer research!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.