चिरतरुण राहण्यासाठी या गोष्टी अवश्य करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 13:00 IST2016-12-11T16:37:00+5:302016-12-12T13:00:45+5:30
स्त्री असो की पुरुष कुणालाच म्हातारे होणे आवडत नाही. वाढते वय लपविण्यासाठी म्हणजेच तरुण दिसण्यासाठी त्याची नेहमी धडपड सुरु असते.

चिरतरुण राहण्यासाठी या गोष्टी अवश्य करा!
स त्री असो की पुरुष कुणालाच म्हातारे होणे आवडत नाही. वाढते वय लपविण्यासाठी म्हणजेच तरुण दिसण्यासाठी त्याची नेहमी धडपड सुरु असते. त्यासाठी तो मिळतील ते सौंदर्य प्रसाधनांचा वापर करुन चेहऱ्यावरील सुरकुत्या लपविण्याचा प्रयत्न करतो. मात्र मिळते ती निराशाच. सौंदर्य प्रसाधनांऐवजी काही घरगुती उपाय केल्यास आपल्या त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होईल.
संतुलित व पौष्टिक आहार
आपल्या आहारात नेहमी हिरवा भाजीपाला, ऋतूमानानुसार फळे तसेच दूधाचा समावेश असू द्या. यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळून त्वचेला पोषणही मिळते.
व्यायाम
सुदृढ आरोग्यासाठी जसा शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे, तसाच चेहºयाच्या त्वचेसाठीदेखील व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्यायाम करताना इंग्रजी अक्षर इ आणि ओ बोला, म्हणजे चेहऱ्याचा चांगल्याप्रकारे व्यायाम होतो. ही प्रक्रिया ५ ते ७ मिनिट करा यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते.
मूग डाळ
चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी विटॅमिन इ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी सकाळी भिजवलेली मूग डाळी चावून खा. यामध्ये विटामिन इ जास्त प्रमाणात असते. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही बरेच वर्ष तरुण राहू शकताय.
आवळ्याचे सेवन
त्वचेच्या आरोग्यासाठी विटॅमिन सी देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. विटॅमिन सी चेहरा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. यासाठी नियमित आवळा खाल्ला पाहिजे. कारण आवळ्यामध्ये विटॅमिन सीचे प्रमाण भरपूर आहे. जे तुम्हाला तरुण ठेवण्यासाठी मदत करते.
गुलाब पाणी
गुलाब पाण्यासोबत २-३ थेंब ग्लिसरीन, १-२ चमचे लिंबाचा रस मिसळून झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते