​चेहऱ्याच्या आकारानुसार असे करा ‘आयब्रो’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 17:04 IST2016-12-15T17:01:23+5:302016-12-15T17:04:31+5:30

चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी आयब्रोची खूप महत्त्वाची भूमिका असते. बऱ्याचदा चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रो केला जात नाही. आयब्रो जर व्यवस्थित बनविला नसेल चेहऱ्याचा टवटवीतपणा जाऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते...

Do this as 'Face' on face shape! | ​चेहऱ्याच्या आकारानुसार असे करा ‘आयब्रो’!

​चेहऱ्याच्या आकारानुसार असे करा ‘आयब्रो’!

हऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी आयब्रोची खूप महत्त्वाची भूमिका असते. बऱ्याचदा चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रो केला जात नाही. आयब्रो जर व्यवस्थित बनविला नसेल चेहऱ्याचा टवटवीतपणा जाऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते. त्यामुळे मेकअप करताना आयब्रो काळजीपूर्वकच बनवावा. मग आपल्या चेहऱ्याला कसा आयब्रो चांगला वाटेल याबाबत जाणून घेऊया.
* जर तुमचा चेहरा अंडाकृती आकारात असेल तर आयब्रो हलक्या पद्धतीने बनवा. बऱ्याच सेलिब्रेटी या प्रकारचा आयब्रो बनविताना दिसून येतात.  
* जर तुमचा चेहरा गोल असेल तर ऊंच आयब्रो बनवा ज्यामध्ये मधोमध उभार असेल. गोल चेहऱ्यावर गोल आकाराचा आयब्रो कधीच बनवू नका.
* जर तुमचा चेहरा उभट आकारात असेल तर त्याच्यावर सपाट आयब्रो बनवा. त्यामुळे चेहरा अधिक आकर्षक दिसतो.
* जर तुमचा चेहरा चौकोनी आकारात आहे तर भुवयांना मोठे ठेवा आणि त्यांना हलकेच गोल बनवा. पूर्ण गोल करण्याची आवश्यकता नाही.
* जर तुमचा चेहरा हृदयाच्या आकारात असेल तर गोल आकारात आयब्रो बनवा. टी. व्ही. मालिकांमध्ये भरपूर अभिनेत्री याच प्रकारच्या आयब्रो बनवतात.

Web Title: Do this as 'Face' on face shape!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.