दारु सेवनामुळे होतात हे आजार ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 19:33 IST2016-03-30T02:32:41+5:302016-03-29T19:33:40+5:30

 दारु सेवन सुरु केल्यानंतर तुरंत आजाराची लागण होत नाही.

Diseases due to alcohol consumption ... | दारु सेवनामुळे होतात हे आजार ...

दारु सेवनामुळे होतात हे आजार ...

----
-----------------------------------------------------------
 परंतु, वय जादा झाल्यानंतर त्याचे सेवन हे कमी करावे. यामुळे ब्लेड प्रेशर, ह्दय रोग, वजन वाढणे यासह विविध प्रकारचे आजार होतात. तसेच यापेक्षा काही जीवघेणे आजारही तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे दारुच्या सेवनामुळे काय काय आजार होऊ शकतात त्याची ही माहिती.
लिव्हर सिरोसीस : दारु ही  लिव्हरसाठी विषाचे समान असते. दारु ही त्याच्यावर असे घाव करते की, त्यामुळे लिव्हर खराब होऊन ते काम करणेच बंद करते.
बीपी : ज्यादा दारू पिण्यामुळे बीपी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते. 
वजन वाढते: दारु व बिअरमुळे आपले वजन वाढते. आपण डायटिंग करीत आहात व दारुही पित असाल तर आपण कधीही बारीक होऊ शकत नाही. वजन  वाढल्यामुळे अनेक आजाराचे लागण होते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. 
हृदयाचे आजार : दारुचे सेवन करणाºयांना ह्दयाचे आजार होण्याची मोठी शक्यता असते. 
एनिमिया: आपण दारुचे सेवन करीत असाल तर  त्यामुळे आपल्याला  एनिमियाची लागण होते. तसेच आपण काम न करताही थकून जाऊ शकतो.
गाठी : गाठी या हाडामध्ये यूरिक एसिड जमा झाल्यामुळे होतात. आपण जर जादा दारुचे सेवन करीत असाल तर गाठीचा त्रास हा खूप वेदनादायी ठरु शकतो. 

Web Title: Diseases due to alcohol consumption ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.