नैराश्यामुळे वाढतो टाईप-2 मधुमेहाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 20:06 IST2016-04-14T03:06:40+5:302016-04-13T20:06:40+5:30

नैराश्याबरोबर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि अपायकारक कोलेस्टेरॉलची पातळी यामुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. 

Depression increases Type 2 diabetes risk | नैराश्यामुळे वाढतो टाईप-2 मधुमेहाचा धोका

नैराश्यामुळे वाढतो टाईप-2 मधुमेहाचा धोका

ा नव्या रिसर्चनुसार, नैराश्याबरोबर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि अपायकारक कोलेस्टेरॉलची पातळी यामुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका सहा पट अधिक वाढतो.

केवळ नैराश्य असलेल्या लोकांना टाईप-२ मधुमेह होण्याचा तितका धोका नसतो. आणि ज्या लोकांमध्ये केवळ लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, अनहेल्दी कोलेस्टेरॉल असते त्यांना अशा प्रकारे मधुमेह होण्याचा चार पट अधिक धोका असतो.

कॅनडा विद्यापीठाचे सहप्राध्यापक नॉर्बर्ट श्मिट्झ यांनी सांगितले की, या संशोधातून असे समोर आले आहे की, केवळ नैराश्यामुळे नाही तर त्याबरोबर मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर्समध्ये होणारी वाढ यांच्यामुळे टाईप-२ मधुमेह आणि हृदयविकाराची शक्यता वाढते.

‘मोलेक्युलर सायकियाट्री’ या जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. 40 ते 69 वयोगटातील 2525 स्वयंसेवकांनी या प्रोजेक्टमध्ये साडे चार वर्षांसाठी सहभाग घेतला होता. त्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती.

Web Title: Depression increases Type 2 diabetes risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.