​वाद : रवींद्र जडेजाचा पत्नीसह सिंहासोबत सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 15:06 IST2016-06-17T09:36:10+5:302016-06-17T15:06:10+5:30

भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा नव्यानेच लग्न झाल्यानंतर पत्नी रीवाबासोबत गिरच्या जंगल सफारीवर गेला असता सिंहासोबत फोटोसेशन केले.

Debate: Seamohobat Selfie, wife of Ravindra Jadeja | ​वाद : रवींद्र जडेजाचा पत्नीसह सिंहासोबत सेल्फी

​वाद : रवींद्र जडेजाचा पत्नीसह सिंहासोबत सेल्फी

रतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा नव्यानेच लग्न झाल्यानंतर पत्नी रीवाबासोबत गिरच्या जंगल सफारीवर गेला असता सिंहासोबत फोटोसेशन केले. काही फोटो व्हायरल झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. गिरमध्ये गाडीच्या खाली उतरून फोटो घेण्यास सक्त मनाई असल्याने फॉरेस्ट विभागाने त्याच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. 


बुधवारी गिर सफारीमध्ये रवींद्र जडेजाने त्याची पत्नी रीवाबासोबत जिप्सीमधून खाली उतरुन सिंहाच्या जवळ जाऊन फोटो काढले होते. ते दोघेही सिंहापासून अवघ्या १० ते १२ फुटांवर होते. हे कृत्य बेकादेशीर मानले जाते तसेच अतिशय जोखमीचे होते. 

- गिर नॅशनल पार्क अँड सेन्चुरीचे (जीएनपीएस) प्रमुख अधिकाºयांचे म्हणणे आहे, की आम्ही पार्कच्या अधीक्षकांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 
- तर, अधीक्षक राम रतन लाला म्हणाले, 'आम्हाला माहिती मिळाली आहे की रवींद्र जडेजाने गाडीतून उतरुन सिंहासोबत सेल्फी घेतला होता. त्यावेळी दोन अधिकारी ही तिथे उपस्थित होते. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. जंगलामध्ये फिरत असताना गाडी खाली उतरणे गुन्हा आहे.'
 

Web Title: Debate: Seamohobat Selfie, wife of Ravindra Jadeja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.