केसांमध्ये कोंडा होणं एक सामान्य समस्या आहे. त्यात पावसाळ्यात ही समस्या अधिकच त्रासदायक ठरते. केसातील हा कोंडा दूर करण्यासाठी मग लोक वेगवेगळे उपाय करत बसतात. पण प्रत्येकालाच याचा फायदा होतो असे नाही. केमिकल प्रॉक्टच्या वापरानेही फायदा होईलच असे नाही. त्यामुळे काही वेळा नैसर्गिक उपाय करणेही फायदेशीर ठरतं. असेच काही घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

1) कडूलिंब - पाव कप कडूलिंबाचा रस, नारळाचं दूध व बीटाचा रस एकत्र करून त्यात चमचाभर नारळाचं तेल एकत्र करून टाळूवर मसाज करावा. 20 मिनिटांनी केस हर्बल शॅम्पूने धुवावेत. हा प्रयोग आठवड्यातून दोनदा केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

2) लिंबू - यामध्ये व्हिटामिन सी आणि अ‍ॅसिड अधिक प्रमाणात असल्याने कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत होते. त्यामुळे लिंबाची फोड थेट टाळूवर 10-15 मिनिटे चोळावी. नंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

3) बेकिंग सोडा - हा अल्कलाईन असल्याने टाळूवरील मृत पेशी काढून टाकण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे कोमट पाण्याने केस धुताना बेकिंग पावडर पाण्यात मिसळून जाडसर पेस्ट बनवावी. व टाळूवर हलका मसाज करावा. त्यानंतर नेहमीच्या शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

4) कोरफडीचा गर - कोरफडीचा गर थंड आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल असल्याने कोंड्याची समस्या कमी होते. मात्र हा गर लावताना केसांना तेल नाही याची काळजी घ्या. केस धुताना सौम्य शाम्पू किंवा पाण्याचा वापर करा.

5) मेथीचे दाणे - 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मिसळावे. हे मिश्रण 30 मिनिटे केसांवर लावून ठेवावे. नंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. 

(Image Credit : 

Anveya Living)

6) रिठा - रात्रभर 10-15 रिठा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या रिठ्याची पावडर तयार करा. रिठा पावडर पाण्यात उकळून गाळून घ्या. त्यामध्ये आवळ्याची पावडर किंवा रस मिश्रित करा आणि तयार मिश्रण टाळूवर हलक्या हाताने लावा. अर्धा तासाने ही पेस्ट सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवावी.


Web Title: Cure dandruff these 6 home remedies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.