(Image Credit : mayoclinic.org)

थंडीला सुरूवात होताच टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकांना हैराण करते. कितीही स्वच्छता करा, गरम पाण्यात बुडवून पाय स्वच्छ करा, टाचांना भेगा पडतात. अशात अनेकांच्या हे लक्षात येत नाही की, यावर काय उपाय करावा. त्यामुळे पायांना पडलेल्या भेगा लपवाव्या लागतात. तुम्हाला जर वाटत असेल की, या हिवाळ्यात तुमच्या टाचांना भेगा पडू नये आणि पाय सुंदर दिसावेत तर काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) खोबऱ्याच्या तेलाने केवळ केस आणि चेहऱ्याचीच त्वचा चांगली राहते असे नाही तर टाचांना पडलेल्या भेगाही दूर होतात. रात्री झोपताना पायांना तेल लावून झोपावे. याने पायांची त्वचा मुलायम होईल. तसेच तुम्ही ऑलिव्ह ऑइलचाही वापर करू शकता. ओटमील पावडरमध्ये जोजोबा ऑइल मिश्रित करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाचांना लावा. काही वेळाने पाय कोमट पाण्याने धुवावे.

२) कॉफी ग्राउंड्स टाचांची सूज दूर करते. तसेच वेदनाही कमी होतात. कॉफी ग्राउंड्समध्ये अ‍ॅंटी-इफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. ज्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या दूर होते. याने तळपायांना स्क्रब केल्याने त्वचेच्या टेक्सचरमध्येही सुधारणा होते.

३) मध सुद्धा त्वचेला मॉइश्चराइज करतं. पाय स्वच्छ करून रात्री झोपण्याआधी मध लावा, थोडावेळ ठेवा आणि नंतर पाय पाण्याने धुवावे. याने टाचेची त्वचा हायड्रेट राहते. तसेच बकेटीत थोडं पाणी घेऊन त्यात मध टाका. त्यात पाय ठेवा, काही वेळाने पाय टॉवेलने पुसून घ्या. असं नियमित करा.

(Image Credit : apost.com)

४) बेकिंग सोड्याने पायांना स्क्रब करा. याने टाचांना पडलेल्या भेगांनी होणाऱ्या वेदना आणि सूज दूर होईल. पायांच्या बोटांमध्ये फंगसही होणार नाही.


Web Title: Cracked heels in winter home remedies for cracked heel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.