​जोडीदाराच्या सवयीचा वजनावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 02:21 IST2016-02-25T09:21:26+5:302016-02-25T02:21:26+5:30

 नव्या संशोधनुसार तुमच्या जोडीदाराचे खानपान आणि जीवनशैलीचा तुमच्यावर परिणाम होतो.

Consequences of the partner's weight | ​जोडीदाराच्या सवयीचा वजनावर परिणाम

​जोडीदाराच्या सवयीचा वजनावर परिणाम

ुष्यभराच्या जोडीदाराचा आपल्यावर कळत न कळत परिणाम होतच असतो. पण त्यांच्या सवयींचा आपल्या वजनावरही परिणाम होतो असे सांगितल्यास कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मात्र, नव्या संशोधनुसार तुमच्या जोडीदाराचे खानपान आणि जीवनशैलीचा तुमच्यावर परिणाम होतो. खासकरून मध्यमवयातील सवर्यीचा दोघांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो.

जसे जसे वय वाढेल तसे तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होणार की नाही हे जोडीदारासोबत शेअर होणाºया वातावरणावर अवलंबून असते. लहानपणाच्या सवयींपेक्षा जोडीदारासोबत घालवलेल्या काळावर हे अधिक डिपेंड असते, अशी माहिती इंग्लंडमधील एडिनबर्ग विद्यापीठातील प्रमुख संशोधक क्रिस हॅले यांनी दिली.

couple

‘पीएलओसएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात नमुद केलेले आहे की, प्रौढवयातील सवयी, जीवनशैली आणि लठ्ठपणा यांचा संबंध नव्यानेच समोर आला आहे. त्यामुळे संशोधकांची लठ्ठपणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होणार आहे.

सुमोर वीस हजार लोकांचे अध्ययन करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. प्रत्येकाच्या कुटुंबातील अनुवांशिकता, बालपण व प्रौढवयातील घरामधील वातावरण यांचा त्यांनी आरोग्य आणि लठ्ठपणाशी सांगड घातली.

Web Title: Consequences of the partner's weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.