​कॉफी, लिव्हर आणि बरचं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 02:00 IST2016-03-08T09:00:53+5:302016-03-08T02:00:53+5:30

दिवसातून दोन कप अधिक कॉफी पिणाऱ्या लोकांचे लिव्हर (यकृत) खराब होण्याचे शक्यता ४४ टक्क्यांनी कमी असते.

Coffee, liver and plenty of fun | ​कॉफी, लिव्हर आणि बरचं काही

​कॉफी, लिव्हर आणि बरचं काही

फी पिण्याचे तोटे आणि फायदे सर्वश्रुत आहेत. कॉफी पिण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे.

खासकरून तळीरामांना ते खूश करणारे आहे. नवीन स्टडीनुसार दिवसातून दोन कप अधिक कॉफी पिणाऱ्या लोकांचे लिव्हर (यकृत) खराब होण्याचे शक्यता ४४ टक्क्यांनी कमी असते.

कॉफीमुळे यकृताचा घातक आजार ‘सिर्होसीस’ होण्याचा धोका थोडा कमी होतो. ‘सिर्होसीस’मुळे हृदयविकार होऊ शकतो. अद्याप तरी या आजारावर वैद्यकीय इलाज उपलब्ध नाही. त्यामुळे कॉफी केवळ उत्तेजक च नाही तर आरोग्यलाभदायकही आहे.

परंतु दारूमुळे यकृताला पोहचणाºया हानीपासून वाचण्यासाठी कॉफी त्यावर उपाय असे मानणे चूक आहे. हं मात्र, रात्री जरा जास्त झाल्यावर सकाळी कॉफी पिल्यामुळे हँगओव्हर कमी होण्यास मदत होऊ शकते. सुमारे ४.३ लाख लोकांनी या अध्ययनात सहभाग घेतला होता.

Web Title: Coffee, liver and plenty of fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.