कॉफीमुळे येतो सहजपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:52 IST2016-02-16T11:52:14+5:302016-02-16T04:52:14+5:30
व्यायाम करीत असताना जर कॅफिनचे प्रमाण नियमित असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.

कॉफीमुळे येतो सहजपणा
मात्र, वेळ नसणे, झोप न होणे, आळशीपणा आदी कारणे व्यायम न करण्यासाठी देण्यात येतात. मात्र कॉपी ही त्यासाठी उपयुक्त ठरू शकते. व्यायामाचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कॉफी फायदेशीर ठरू शकते असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
ब्रिटनमधील केंट विद्यापीठाचे प्रा. सॅम्युल मॅरकोरा यांच्या मते, व्यायाम करीत असताना जर कॅफिनचे प्रमाण नियमित असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. व्यायामाचा संकल्प पूर्ण करणाºयांसाठी कॉफीचे सेवन उपयुक्त आहे.
सध्या असणारा कमी वेळ हा व्यायामासाठी मुख्य अडथळा ठरत असतो. मॅरकोरा यांनी याच मुद्द्याकडे लक्ष वेधताना मेहनत घेण्याचे आकलन असल्यामुळेच अनेकांची प्रवृत्ती ही रिकाम्या वेळेतही बसूनच काम करण्याची असते. त्यासाठी कॉफी किंवा अन्य शारीरिक क्षमता वाढविणाºया औषधांमुळे व्यायामाच्या वेळी घ्याव्या लागणाºया प्रयत्नांमध्ये अधिक सहजपणा येतो.