फॅशन ट्रेन्ड सतत बदलत आहेत. आता पुरूषांसाठी फिट बॉडी असणं पुरेसं नाहीये. त्यांनाही सुंदर आणि आकर्षक दिसायचंय. त्यामुळे त्यांच्यासाठीही बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. क्लीन चेस्टसाठी पुरूषांना वॅक्सिंगचा सल्ला दिला जातो. पण यादरम्यान काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सौंदर्य बाजारात महिला आणि पुरूषांसाठी त्यांच्या गरजेनुसार उत्पादने उपलब्ध आहेत. जर तुम्हालाही वाटतं की, तुम्ही इतरांपेक्षा स्पेशल दिसावं तर तुम्हाला थोडी मेहनत तर करावीच लागेल.
आधी असं मानलं जात होतं की, पुरूषांचा लूक रफ अॅन्ड टफ असायला हवा. यात चेस्टवरील केसांनाही महत्त्व दिल जात होतं. पण आता सिक्स पॅकची आवड असणारे तरूण चेस्ट क्लीन ठेवणे पसंत करत आहेत. खरंतर क्लीन चेस्टसाठी पुरूषांना वॅक्सिंगचा सल्ला दिला जातो. पण यादरम्यान काही अडचणींचा सामना करावा लागतो.
फॉलो करा या वॅक्सिंग टिप्स
पुरूषांचे केस थोडे जाड आणि रफ असतात, त्यामुळे वॅक्सिंगदरम्यान त्यांना जास्त वेदना होतात. पण जर योग्यप्रकारे वॅक्सिंग केलं गेलं तर वेदना कमी होऊ शकतात. जर तुम्ही स्वत: घरी वॅक्सिंग करत असाल तर गरजेचं आहे की, स्ट्रिप योग्यप्रकारे आधी दाबा आणि त्यानंतर रिमुव्ह करा.
टेस्ट आहे गरजेची
कोणतही सौंदर्य उत्पादन वापरण्याआधी टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. हर्बल म्हटल्या जाणाऱ्या काही उत्पादनांमध्येही काही रसायने मिश्रित केली जातात. ज्यामुळे अॅलर्जीचा धोका असतो. त्यामुळे शरीरावर एके ठिकाणी आधी टेस्ट करा.
केसांच्या लांबीकडे द्या लक्ष
जर वॅक्सिंग करायची असेल तर केसांच्या लांबीवरही लक्ष देणं गरजेचं आहे. जाड आणि रफ केस असल्याने फार लहान असलेल्या केसांची वॅक्सिंग करणे अवघड जातं. त्यामुळे केसांची लांबी कमीत कमी १ सेंटीमीटर असावी. तेव्हाच वॅक्सिंगचा वापर करावा.
वापरा डिस्पोजेबल स्ट्रीप्स
वॅक्स करण्यासाठी नेहमी डिस्पोजेबल स्ट्रीप्सचा वापर करायला हवा. कारण कापडाच्या वापराने इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.
स्वच्छता गरजेची
वॅक्सिंग करण्याची योग्य पद्धत म्हणजे आधी साध्या पाण्याने आंघोळ करा. याने तुमच्या शरीरावरील धूळ, माती आणि घाम स्वच्छ होईल. वॅक्स करण्याआधी छातीवर अॅंटीसेप्टिक जेल आणि पावडरचा वापर नक्की करावा. याने त्वचेवर रॅशेज येणार नाहीत.
वॅक्सिंगनंतर काय?
वॅक्सिंग ही एक फार वेदनादायी प्रोसेस आहे. त्यामुळे वॅक्सिंगनंतर त्वचा आणि शरीराला रिलीफ देणं गरजेचं आहे. वॅक्सिंग केलेल्या भागावर तुम्ही थंड पाण्याने किंवा आइस क्यूबने मसाज करू शकता. तसेच वॅक्सिंगनंतर त्वचेवर मॉइश्चरायजर लावा.
कॉटनचे कपडे
वॅक्सिंगनंतर फार टाइट कपडे वापरू नका. सैल कपडे वापरणे चांगले ठरेल. तसेच वॅक्स केल्यावर लगेच सूर्यकिरणांमध्ये जाणे टाळा आणि तसेच चांगल्या सनस्क्रीनचा वापर करा.