​हेअर कलर निवडताना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 17:33 IST2017-01-04T17:18:52+5:302017-01-04T17:33:48+5:30

सध्या केसांना रंगविणे एक फॅशन स्टेटसच बनले आहे. अगोदर केसांना फक्त काळ्या रंगाने रंगविले जायचे. आता मात्र आपला लूक बदलण्यासाठी लोकं केसांवर नवनवीन प्रयोग करण्यास तयार आहेत.

Choosing Hair Color! | ​हेअर कलर निवडताना !

​हेअर कलर निवडताना !

ong>-Ravindra More

सध्या केसांना रंगविणे एक फॅशन स्टेटसच बनले आहे. अगोदर केसांना फक्त काळ्या रंगाने रंगविले जायचे. आता मात्र आपला लूक बदलण्यासाठी लोकं केसांवर नवनवीन प्रयोग करण्यास तयार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कलर्सदेखील मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, सर्वात मोठे कन्फ्यूजन हे आहे की, केसांसाठी कोणत्या प्रकारचा कलर परफेक्ट असेल. कारण केसांचे प्रकारही वेगवेगळे असतात. यासाठी गरज आहे ती योग्य रंग निवडण्याची. केसांसाठी रंग निवडताना विशेषत: बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आजच्या सदरात आपल्या केसांसाठी नेमका कोणता रंग योग्य असेल याबाबत जाणून घेऊया. 

त्वचेनुसार निवडा हेअर कलर
* जर आपली त्वचा हलक्या पिवळसर रंगाची असेल तर आपल्या केसांना डार्क हेअर कलर खूपच चांगला वाटेल. त्यामुळे लाईट हलका हेअर कलर चुकून वापरू नका, कारण आपल्या केसांना नॅचरल लूक मिळणार नाही. 

* जर आपली गुलाबी त्वचा असेल तर सोनेरी रंग अजिबात वापरु नका. या प्रकारच्या त्वचेच्या लोकांनी आपले केस नैसर्गिक वाटण्यासाठी ‘ऐश टोन’ (एक प्रकारचा टोनर) चा प्रयोग करावा. 

* ज्या लोकांची त्वचा गोरी असते त्यांच्या केसांना कोणताही कलर चांगला शोभून दिसतो. याप्रकारच्या त्वचेचे लोक कोणत्याही शेडचा हेअर कलर वापरु शकतात. 

* जर आपल्या त्वचेत पिवळसरपणा जास्त असेल तर काळा किंवा डार्क काळ्या रंगाचा प्रयोग अजिबात करु नका कारण यामुळे आपल्या त्वचेचा पिवळसरपणा अजूनच वाढून दिसेल.
 
कपड्यांनुसार निवडा हेअर कलर 
* जर आपण लाल, नारंगी, सोनेरी पिवळे आणि आॅलिव्ह ग्रीन रंगाचे कपड्यांमध्ये रुबाबदार दिसत असाल तर आपण गोल्डन ब्लांड, गोल्डन ब्राऊन, स्ट्राबेरी ब्लांड अशा हेयर कलरचा प्रयोग करावा. 

* जे लोक ब्लुईश रेड, रॉयल ब्लू, ब्लॅक व पाइन ग्रीन रंगांच्या कपड्यात जास्त सुंदर दिसत असाल तर आपण प्लॅटिनम, एश ब्लांड, एश ब्राऊन, बर्गंडी व जेट ब्लॅक हेयर कलर  कुल टाइपला हेअर कलरची निवड करु शकता.  

* जर आपणास लाल आणि मरुन रंगाचे कपडे पसंत असतील तर आपल्या केसांना सँडी ब्लांड, बीज ब्लांड व चॉकलेट ब्राऊन यासारखे हेयर कलर खूपच आकर्षक दिसतील. 
 
डोळ्यांनुसार  निवडा हेअर कलर
ज्यांच्या डोळ्यांचा रंग गडद, हिरवा किंवा पिंगट असेल त्यांच्यासाठी वार्म टोन्स घेतलेला म्हणजेच लाल आणि सोनेरी हेअर कलर खूपच चांगला दिसेल. हा रंग नॉर्मली पिवळसर डोळे असलेल्यांसाठीही आकर्षक दिसेल. ज्यांचे डोळे निळे किंवा ग्रे असतील त्यांच्या केसांवर गोल्ड किंवा ऐश रंग खूपच सूट करेल.

Web Title: Choosing Hair Color!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.